झी मराठी वाहिनीवरील ‘मन उडू उडू झाल’ मालिका प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. या मालिकेने अल्पावधीतच घराघरात लोकप्रियता मिळवली आहे. नुकतेच मालिकेमध्ये दिपा आणि इंद्राचे लग्न झाले. या गोड शेवटानंतर मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असतानाच एक दुखःद बातमी नुकतीच समोर आली आहे. मालिकेत नयन कानविंदेची भूमिका साकारणारा अभिनेता अमित परबच्या (Amit Parab) आईचे दुखःद निधन झाले आहे. या बातमीने अमितच्या कुटूंबावर दुखाःचा डोंगर कोसळला आहे.
याबाबत संपूर्ण माहिती अशी की, ‘मन उडू उडू झाल’ मालिकेने घराघरात लोकप्रियता मिळवली होती. मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले होते. यामध्ये मालिकेत नयन कानविंदेची भूमिका साकारणारा अभिनेता अमित परबच्या आईचे २० जुलै २०२२ रोजी दुखःद निधन झाले. या दुखःद बातमीने अमितच्या कुटूंबावर दुखःचा डोंगर कोसळला आहे. आईच्या निधनानंतर अमितने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन भावूक पोस्टही शेअर केली आहे.
View this post on Instagram
आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या पोस्टमध्ये अमित म्हणतो की, “प्रत्येक मुलाच्या आयुष्यात आईचे नुकसान नेहमीच दुःखद आणि भरून न येणारी असते. तू दिलेली शिकवण माझ्या कायम आठवणीत राहशील. तू मला गेल्या २८ वर्षात दिलेल्या संस्कारामुळे मी उभा आहे. तू खरी शूर आहेस आणि तू मला तसे व्हायला शिकवलेस. हे सगळे नीट होण्यासाठी मी खूप प्रयत्न केले पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. मी फक्त देवाच्या इच्छेला सहमती दिली कारण त्याने मला खात्री दिली की त्याने तुझ्यासाठी दुसर्या बाजूने आणखी चांगल्या गोष्टींची योजना आखली आहे. जर मी तुला जाऊ दिले नसते तर ते माझ्यासाठी स्वार्थाचे ठरले असते.”
दरम्यान, अमिच एका कंपनीमध्ये नोकरी करतो. अभिनयाची आवड असल्याने त्याने ‘मन उडू उडू झालं’ मालिकेसाठी ऑडिशन दिली होती. मालिकेतील नयनरावांच्या भूमिकेने अमितला प्रेक्षकांचा रोषही पत्करावा लागला होता.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा –
‘लायगर’ सारखा चित्रपट करूनही अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा का फिरतायत लोकलने?
रात्रीच्या वेळी उर्फी जावेदने केले ‘असे’ काही की, बघणारेही होतील हैराण