Thursday, April 18, 2024

पार्टीमध्ये विना मेकअप, डोक्याला तेल लावून पोहचली नेहा, ‘असे’ तिच्या प्रेमात पडले होते मनोज वाजपेयी

मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) यांची गणना बॉलिवूडच्या प्रतिभावान अभिनेत्यांमध्ये केली जाते. त्यांनी अनेक दमदार भूमिका साकारून चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे. रविवारी (23 एप्रिल)ला अभिनेता त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही तुम्हाला त्यांच्या आयुष्याशी संबंधित एक मजेदार किस्सा सांगणार आहोत.

खरं तर हा किस्सा मनोज वाजपेयी यांच्या पत्नीशी संबंधित आहे. हा किस्सा खुद्द मनोजनेच ‘मनोज वाजपेयी-कुछ पाने की जिद’ या बायोग्राफीमध्ये नमूद केला आहे. या बायोग्राफीमध्ये मनोज वाजपेयी यांनी सांगितले आहे की, पत्नी शबाना रझा म्हणजेच नेहासोबत त्यांची पहिली भेट केव्हा आणि कुठे झाली. तसेच मनोज त्यांच्या प्रेमात कसे पडले हे देखील त्यांनी सांगितले आहे. (manoj bajpayee had once revealed that he fell in love with shabana raza aka neha)

खरं तर 1998 मध्ये फिल्ममेकर हंसल मेहता यांनी एक पार्टी दिली होती. या पार्टीत मनोज वाजपेयीही पोहोचले होते. मनोज सांगतात की, “जेव्हा मी पार्टीत पोहोचलो, तेव्हा मला मेकअप नसलेली, केसाला तेल आणि डोळ्यांवर चष्मा असलेली मुलगी दिसली. मला वाटले की, बॉलिवूडच्या कोणत्याही हिरोईनमध्ये केसांना तेल लावून पार्टीला येण्याची हिंमत नसेल. तर मी याच साधेपणाच्या प्रेमात पडलो.”

पुस्तकात मनोजने असेही सांगितले आहे की, नेहा तेव्हा डिप्रेशनमध्ये होती. खरे तर तोपर्यंत नेहाचा फक्त एकच चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट होता ‘करीब’, ज्यामध्ये नेहा अभिनेता बॉबी देओलसोबत (Bobby Deol) दिसली होती.

मनोज बाजपेयी यांचे हे दुसरे लग्न आहे. याआधी अभिनेत्याचे लग्न दिल्लीतील एका मुलीशी झाले होते. मात्र, ते लग्न फार काळ टिकले नाही आणि दोघांचा घटस्फोट झाला. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, मनोज वाजपेयी अलीकडेच Zee5 वर रिलीझ झालेल्या ‘डायल 100’ चित्रपटात दिसला होता. त्याच वेळी, काही काळापूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘फॅमिली मॅन 2’ या वेबसीरिजमध्ये मनोज वाजपेयीच्या कामाचे खूप कौतुक झाले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सोपा नव्हता मनोज वाजपेयी यांचा चित्रपट प्रवास, वडिलांना शेतात करायचे मदत, बिग बींचा ‘हा’ चित्रपट पाहून धरली अभिनयाची वाट
जेव्हा शाहरुख खान मनोज वाजपेयीला पहिल्यांदा घेऊन गेला होता डिस्कोमध्ये; शेअर करायचे सिगारेट अन् बिडी

हे देखील वाचा