Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘माझ्या कविता कॉपी निघाल्यास…’, कविता चोरल्याच्या आरोपावर गीतकार मनोज मुंतशीर यांची प्रतिक्रिया

 

अनेकांनी मनोज मुंतशीरवर कविता चोरल्याचे आरोप केले आहेत. नेटकऱ्यांचे असे म्हणणे आहे की, त्यांनी साल २०१९ मध्ये ‘मेरी फितरत है मस्ताना’ या प्रकाशित केलेल्या पुस्तकामध्ये ‘मुझे कॉल करना’ ही कविता आधीच कुणीतरी लिहिलेली आहे आणि त्यांनी या कवितेला हिंदीमध्ये रूपांतरित केले आहे.

‘मुझे कॉल करना’ यावरील वाद थांबत नाही तोच नवीन वादाने डोके वर काढले आहे. नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करत त्यांच्यावर आरोप केला आहे की, ‘तेरी मिट्टी’ या गाण्याचे बोल मनोज यांनी पाकिस्तानमधील एका गाण्यातून चोरून स्वतः लिहिले आहे. साल २००५ मध्ये पाकिस्तानमध्ये एक गाणं आलं होतं ‘तेरी मिट्टी’ गाण्यामध्ये त्याचेच बोल आहेत असे नेटकरी म्हणतात.

या सर्व प्रकारावर त्यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्वतःचे मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, “माझ्या ‘तेरी मिट्टी’ या गाण्यामध्ये दुसऱ्या कोणत्या गाण्याचे बोल चोरलेले असतील, तर मी कविता लिहिणेच सोडून देईल. मी राष्ट्रवादी आहे त्यामुळे मला अशी शिक्षा दिली जात आहे.”

पुढे ते म्हणाले की, “जे लोक माझ्यावर आरोप करत आहेत त्यांनी याची पडताळणी केली पाहिजे. कारण व्हायरल होत असलेला व्हिडिओ ‘केसरी’ चित्रपट आल्यानंतर बऱ्याच महिन्यांनी पोस्ट केले आहे. ज्या गाण्यावरून एवढा वाद सुरु आहे ते गाणे कोणत्या पाकिस्तानी गायिकेने नाही, तर आपल्या भारतीय गायिका गीता रबारी यांनी गायले आहे. मी जे काही लिहितो त्यासाठी मी कोणत्या ना कोणत्या गोष्टीमधून प्रेरित झालेलो असतो. त्यामुळेच मी ते लिहितो. देशावर असलेल्या या गाण्याबद्दल असे घाणेरडे राजकारण करू नका.”

नुकतेच त्यांनी कबीर खान यांच्या मुघलांना राष्ट्रनिर्माता म्हटल्याच्या वक्तव्यावर स्वतःचे मत मांडत एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी अकबर, जहांगीर आणि हुमायूंची तुलना दरोडेखोरांबरोबर केली होती. त्यानंतर देखील काहींनी त्यांना ट्रोल केले. ‘केसरी’ या चित्रपटासाठी लिहिलेले ‘तेरी मिट्टी’ हे गाणं प्रदर्शित झाले तेव्हा प्रेक्षकांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते. कारण हे गाणं देशाविषयीची प्रेम भावना आणि आदर व्यक्त करणारे आहे. या गाण्यासाठी मनोज यांनी लिहिलेल्या कवितेवरून सुरु असलेल्या वादामुळे ते सध्या फार दुःखी आहेत.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

श्रीदेवी यांच्या हिट गाण्यावर जबरदस्त नाचली पाकिस्तानी अभिनेत्री आयजा खान

मंसूर अली खान पतौडींच्या पुण्यतिथी दिनी सोहा अली खान शर्मिला टागोर यांनी घेतले त्यांच्या कब्रचे दर्शन

फॅन्सला पुन्हा झाला बिग बॉस फेम सोनाली फोगट यांच्या जबरदस्त डान्सचा ‘दिदार’

हे देखील वाचा