Wednesday, June 26, 2024

पती-पत्नीचं नातं संपलं! सात जन्माच्या शपथा खाऊनही मोडला मानसी नाईक अन् प्रदीप खरेराचा संसार?

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाइक हिने आपल्या दमदार आदाकारीने मराठी इंडस्ट्रीमध्ये वेगळेच स्थान निर्माण केले आहे. सतत आपल्या बोल्ड स्टाइल आणि लावणीमुळे ओळखली जाणारी अभिनेत्री सध्या आपल्या वैयक्तीक आयुष्यामुळे खुपच चर्चेतआली आहे. काही दिवसांपासून सोशल मीडियावर तिच्या घडस्फोटाच्या चर्चांना उधान आले होते मात्र, यावर अभिनेत्रीने स्वत:च खुलासा केला आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाइक (Mansi Naik) हिने आपल्या वैयक्तीक आयुष्यामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. सोशल माडियावर सतत तिच्या घटस्फोटच्या बातम्यांना उधान आले होते. घटस्फोटाच्या बातम्या कितपत खऱ्या आणि किती खोट्या यामुळे चाहत्यांमध्ये गोंधळाचे वातावरण पसरले होते. मात्र, अभिनेत्रीने स्वत:च एका मुलाखतीदरम्या याविषयी खुलासा केला आहे.मानसीच्या घटस्फोटाच्या निर्णयामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तिने स्पष्टपणे सांगितले आहे की, घटस्फोटासाठी त्यांनी अर्ज केले आहे.

गेल्या वर्षी म्हणजेच ( दि, 19 जानेवारी 2021) साली मानसी आणि प्रदिप खरेरा (Pardeep Kharera) विवाह बंधनात अडकले होते मात्र, लग्नाला एक वर्षही पुर्ण झाले नाही आणि यांच्या नात्याला पुर्णविराम लागला. आता सोशल मीडियावर यांच्या घटस्फोटच्या बातम्यांना घेऊन अनेकज वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आपले मत व्यक्त करत आहेत.

 

View this post on Instagram

 

मानसी आणि प्रदिप लग्नानंतर खूप रोमांटिक व्हिडिओ आणि फोटो सतत शेअर करायचे मात्र, अचानकच सोशल मीडियावरील सगळे फोटो व्हिडिओ दोघांनीही आपल्या अकाउंटवरुन डीलीट केले त्यामुळे त्यांच्या नात्यामध्ये काही दुरावा आला आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला होता आणि तेव्हापासून त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधान आले होते. मात्र, या चर्चा खरोखर ठरल्या. घटस्फोट घेण्याचा अर्ज केला आहे असे अभिनेत्रीने सांगितल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दिशा पटानीची साेशल मीडियावर हवा, बाथरूम सेल्फीने चाहत्यांना घातली भूरळ
अर्रर्र! असे काय घडलं की, सुंबुल तौकीर खान वडिलांसमोर रडली ढसाढसा ?

हे देखील वाचा