Tuesday, March 19, 2024

वैवाहिक आयुष्यात मिळालं नाही सुख, आता एकटीच राहतेय मानसी नाईक

मराठमोळी लोकप्रिय अभिनेत्री मानसी नाईक आज (दि, 3 फेब्रुवरी) रोजी आपला 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. मानसी आपल्या कामासोबतच वैयक्तीक आयुष्यामुळे कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तिने पती प्रदिप खरेरापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. एकावर्षातच त्यांच्या संसारामध्ये अशा काही गोष्टी घडल्या ज्यामुळे अभिनेत्रीने थेट घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. मानसीच्या या खास दिवशी तिच्या आयुष्याद्दल जाणून घेऊया.

‘बघतोय रिक्षावाल’ या गाण्यापासून प्रसिद्धी झोतात आलेली मानसी नईक (Mansi Naik) हिने आपल्या दमदार डान्सने आणि अभिनयाने मराठी इंडस्ट्रीमध्ये वेगळेच स्थान निर्माण केलं आहे. आज तिला कोणत्याही ओळखीची गरज नाही. मानसी अभिनयासोबतच सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. त्याशिवाय लाखो चाहते मानसीला फॉलो करतता.

मानसी लग्नानंतर आपल्या पतीसोबतचे फोटो आणि व्हिडिओ सतत शेअर करायची, त्याशिवाय प्रेकांनाही त्यांची जोडी प्रचंड आवडायची. मात्र, एक दिवस अचानच तिने तिच्या सोशल मीडियावरुन पती प्रदिप खरेरा (Pradeep Kharera) सोबतचे सगळे फोटो आणि व्हिडिओ डीलीट केले ज्यामुळे अनेक चाहत्यांमध्ये घटस्फोटाची बातमी पसरली. मात्र, ही बातमी कितपत खरं आहे हे तिच्या वक्तव्यानंतरच समजलं.

 

View this post on Instagram

 

मानसीने एका मुलाखतीदरम्यान घटस्फोटांच्या चर्चांवर भाष्य केलं होतं, त्यवेळी ती म्हणाली की, “घटस्फोटासाठी मी अर्ज दिला आहे आणि त्याची प्रक्रिया आता सुरु आहे.” मानसीच्या अशा वक्तव्यानंतर चाहत्यांमध्ये खळबळ माजली होती. त्याशिवाय तिने घटस्फोटांच्या चर्चांना खंर असल्याचंही सांगितलं होतं. त्याशिवाय घटस्फोटाचं कारणावरही मानसीने स्पष्टच मत मांडले.

मानसी नाईक म्हणाली की, “नेमकं काय चुकलं हे सांगणं आता माझ्यासाठी कठीण आहे. आमच्यात काही गोष्टी ठीक होऊ शकल्या नाहीत आणि हे सगळं खूपच वेगात घडलं. पण एक स्त्री म्हणून माझा स्वाभिमान आणि स्वतःची काही मतंही महत्त्वाची आहेत. एखाद्या व्यक्तीला आपण सोडून देऊ एवढ्या खालच्या थराला ती व्यक्ती जाऊ शकते हे समजून घेणं माझ्यासाठी गरजेचं होतं. तिकडे बरेच लोक मानसिक आरोग्याबाबत बोलताना दिसतात. जोडीदाराने एकमेकांना कसं समजून घ्यावं, एकमेकांशी कसं बोलावं याबाबत सांगतात. पण जर तुमच्या नात्यात समजूतदारपणा नसेल तर ती तुमच्यासाठी धोक्याची सूचना आहे. अशा नात्यातून बाहेर पडा आणि पुढे जा.”

मानसीच्या अशा वक्तव्यानंतर दिसून येत आहे की, ती तिच्या वैवाहिक आयुष्यामध्ये सुखी नव्हती त्याशिवाय प्रदिप खरेरा आणि मानसीमध्ये काही गोष्टी होत्या ज्या एकमेकांनी समजून घेणं फारच महत्वचं होतं. तिने इतर महिलांनाही सल्ला दिला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
काय सांगता! ‘द कपिल शर्मा शो’ला ‘या’ प्रसिद्ध हास्यकलाकाराने ठोकला रामराम
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी सूर्यगढ पॅलेसमध्ये लग्न करून मुंबईत देणार ग्रँड रिसेप्शन

हे देखील वाचा