Tuesday, September 26, 2023

‘दिलनवाज शेख’ कशी बनली संजय दत्तची पत्नी मान्यता? लग्नाआधी करायची ‘सी ग्रेड’ सिनेमात काम

कलाकारांच्या पत्नी देखील कलाकारांइतक्याच प्रसिद्ध आणि लोकप्रिय असतात. या स्टार वाईफ्सने फक्त कलाकारांच्या पत्नी एवढी ओळख न ठेवता त्यांचे करिअर देखील तितकेच उत्तम पद्धतीने तयार केले आहे. अनेक कलाकारांच्या पत्नी इंटेरियर डेकोरेशनमध्ये यशस्वी काम करत आहेत, तर काहींच्या पत्नी या रायटिंग करतात, काहींनी स्वतःचे प्रोडक्शन हाऊस सुरु केले, तर काही हॉटेलिंगच्या उद्योगात आहे. या ना त्या क्षेत्रात या स्टार वाईफ्स स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एक स्टार वाईफ्स बद्दल सांगणार आहोत. जिने तिच्या अभिनयातील अयशस्वी करिअरला पूर्णविराम लावला आणि दुसऱ्या क्षेत्रात यशस्वी करिअर तयार केले. यासोबतच पत्नी आणि आईच्या सर्व जबाबदाऱ्या देखील तितक्याच योग्य पद्धतीने पार पाडल्या. ही स्टार वाईफ आहे बॉलिवूडच्या संजू बाबाची म्हणजेच संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त. शनिवारी (22 जुलै) मान्यता दत्त तिचा 46 वाढदिवस साजरा करत आहे. याच निमित्ताने जाणून घेऊया तिच्या आयुष्यातील काही खास आणि महत्वाच्या गोष्टी.

मान्यता दत्तचा जन्म 22 जुलै,1978 रोजी मुंबईमध्ये तिचा जन्म झाला. मान्यताचे संपूर्ण बालपण दुबईमध्ये गेले. तिचे खरे नाव दिलनवाज शेख असे होते. बॉलिवूडच्या चकाचौंधच्या आकर्षणाची मान्यताला भूरळ पडली आणि तिने दुबईमधून निघत थेट मुंबई गाठली. मुंबईत आल्यावर तिला काम मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. तिच्या या संघर्षांमुळे आणि मेहनतीमुळे तिला प्रकाश झा यांच्या ‘गंगाजल’ या सिनेमात एक डान्स नंबर करायला मिळाला. मात्र, यानंतरही तिचा संघर्ष काही थांबला नाही. तिने ‘लव्हर्स लाईक अस’ या सी ग्रेड सिनेमात देखील काम केले. मान्यताने या क्षेत्रात एन्ट्री केल्यावर तिचे नाव सारा खान ठेवले. मात्र, नंतर तिने पुन्हा नाव बदलून मान्यता दत्त ठेवले. पुढे मान्यताने कमाल आर खानच्या देशद्रोही चित्रपटातही काम केले. मात्र, तिला या क्षेत्रात अपेक्षित यश मिळाले नाही.

मान्यताच्या एका चित्रपटाचे राइट्स संजय दत्तने 20 लाखांमध्ये विकत घेतले. त्यादरम्यान नितीन मनमोहन यांनी संजय आणि मान्यता यांची पहिली भेट करून दिली. त्यानंतर त्यांच्या भेटी वरचेवर होत गेल्या, तेव्हा संजय दत्त ज्युनियर कलाकार असलेल्या नाडिया दुरानीला डेट करत होता. मान्यता हळूहळू संजयची जेवण बनवू लागली. ती नेहमी संजयसाठी घरून जेवण बनवून सेटवर पाठवू लागली. जिथे नाडिया फक्त संजयच्या पैसा आणि आलिशान जीवनावर प्रेम करत होती, तिथे मान्यता संजयवर प्रेम करू लागली. काही काळाने या दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली.

या दोघांबद्दल कोणाला जास्त कल्पना नव्हती. मात्र, एका पुरस्कार सोहळ्याला संजयने मान्यतासोबत हजेरी लावली आणि या दोघांच्या अफेअरच्या बातम्या मीडियामध्ये यायला लागल्या. जवळपास दोन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. या लग्नाला खूप जवळची लोकंच उपस्थित होती. 2008 साली अतिशय कमी लोकांच्या उपस्थितीत गोव्यामध्ये या दोघांचे लग्न पंजाबी पद्धतीने पार पडले. संजयचे मान्यतासोबत तिसरे आणि मान्यताचे संजयसोबत दुसरे लग्न होते.

लग्नानंतर दोन वर्षांनी या दोघांना शाहरान आणि इकरा ही जुळी मुलं झाली. संजय मान्यताच्या लग्नानंतर काही वर्षांनी संजयला त्याच्या केसमध्ये जेव्हा शिक्षा झाली, तेव्हा मान्यता संजयसोबत सतत उभी दिसली. संजयच्या शिक्षेच्या काळात मान्यताने एकटीने मुलांचा सांभाळ करत संजयच्या मागे त्याची संपूर्ण जबाबदारी योग्यपद्धतीने पार पाडली. मान्यताने संजयच्या सुखात आणि दुःखात त्याला नेहमी साथ दिली.

आज मान्यता जरी चित्रपटांमध्ये दिसत नसली, तरी ती संजय दत्तच्या प्रॉडक्शन हाऊसची सीईओ आहे. पडद्यामागे राहून मान्यता आज या क्षेत्रात कार्यरत आहे. मान्यता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असून ती सतत तिच्या पोस्टमुळे प्रकाशझोतात असते. बी टाऊनच्या लोकप्रिय स्टार्स वाईफ्सच्या यादीत मान्यताचाही नंबर लागतो.

अधित वाचा- 
शिल्पा शिट्टीचा भन्नाट व्हिडिओ व्हायरल; पाहा व्हिडिओ
मौनी रॉय 9 दिवसांनंतर रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, पोस्ट शेअर करत दिले हेल्थ अपडेट्स

हे देखील वाचा