दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांच्या ‘पावनखिंड’ या ऐतिहासिक चित्रपटाला जगभरातील शिवप्रेमींचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. छत्रपती शिवरायांचे स्वामिनिष्ठ मावळे बाजीप्रभू देशपांडे यांच्या अतुलनीय साहसाची ही शौर्यगाथा होती. अंगावर शहारे आणणारी ही गाथा प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडेची प्रमुख भूमिका साकारणारे अजय पुरकर यांच्या अभिनयाचे जोरदार कौतुक झाले होते. याच भूमिकेतील प्रेरणेने अजय पुरकर यांनी विशालगडाच्या पायथ्याशी आपल घर बांधल आहे. या बातमीने त्यांच्यावर शिवप्रेमी कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहेत.
बाजीप्रभू देशपांडे यांच्या अतुलनीय पराक्रमावर आधारित ‘पावनखिंड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात बाजीप्रभूंच्या प्रमुख भूमिकेत अजय पुरकर यांनी अप्रतिम अभिनय करत सर्वांचीच वाहवा मिळवली होती. बाजीप्रभूंची ऐतिहासिक भूमिका साकारताना त्यांनी आपल्या दमदार अभिनयाची झलक सर्वांनाच पाहायला मिळाली होती. याच भूमिकेनंतर ज्या ठिकाणी ही ऐतिहासिक लढाई झाली. त्याच ठिकाणी म्हणजे विशालगडाच्या पायथ्याशीच आपण घर बांधायच हा निश्चय त्यांनी केला होता. आणि आता त्यांच हे स्वप्न पुर्ण झाल आहे.
दिग्पाल लांजेकर यांच्या ‘पावनखिंड’ चित्रपटाने कमाईचे नवनवीन रेकॉर्ड केले होते. याबद्दल बोलताना अजय पुरकर म्हणतात की “या सिनेमामुळे फक्त मोठ्यांचच नाही तर छोट्या दोस्तांचंही भरभरुन प्रेम मिळालं आहे. हे सगळे छोटे दोस्त मला आवडीने भेटवस्तू घेऊन येतात. एक किस्सा तर एका पालकांनी मला सांगितला तो असा की, त्यांचा मुलगा मध्यरात्री झोपेतून रडत उठला आणि म्हणाला बाजीप्रभू एकटेच उभे राहून लढत आहेत मला तिकडे घेऊन चला. हे निरागस प्रेम पाहून भारावून जायला होतं. या पीढीपर्यंत जेव्हा आपल्या शूरवीरांचं बलिदान पोहोचतं तेव्हा खरं सिनेमा यशस्वी झाला असं ठामपणे म्हणता येईल,” दरम्यान अजय पुरकर यांनी बांधलेल्या घराची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.