Tuesday, June 6, 2023

घराणेशाहीला छेद देणारे दमदार कलाकार, स्वत:च्या हिमतीवर बॉलिवूडमध्ये झाले सुपरस्टार

गेल्या काही वर्षांत सातत्याने ऐकले असंलच, की अमुक अभिनेत्याची-अभिनेत्रीची मुलगी किंवा मुलगा एखाद्या चित्रपटात पदार्पणात करतोय वैगरे वैगरे. यावरून अभिनय क्षेत्रात असलेल्या घराणेशाहीवर चर्चाही रंगवल्या असतील. अर्थातच घराणेशाही फक्त मनोरंजन विश्वातच दिसते अशातला भाग नाही, पण तरी बऱ्याचदा स्टारकिड्स अशाच घराणेशाहीमुळे टीकेचे धनीही ठरत असतात. यातही बॉलिवूड आघाडीवर आहे, पण असं असलं तरी बॉलिवूडमध्ये काही ऍक्टर असेही आहेत, ज्यांनी घराणेशाहीला वैगरे न जुमानता आपली वेगळी ओळख बनवलीये आणि आज ते यशाच्या शिखरावरही आहेत. कोण आहेत ते ऍक्टर या लेखातून जाणून घेऊया.

शाहरुख खान
या यादीतलं पहिलं नाव म्हणजे शाहरुख खान. बॉलिवूडचा बादशाह म्हणून आत्ता जरी शाहरुखला नावजलं जात असलं तरी त्याने हे यश मिळवण्यासाठी मोठे कष्ट घेतलंत बरं. इंडियन आर्मीमध्ये जाण्याचे स्वप्न शाहरुखचे होते, पण ते पूर्ण झालं नाही अन् त्याने मग अभिनय क्षेत्र जवळ केले. त्याला सुरुवातीला मालिकांमध्ये काम करावं लागलं. तो करियर करण्यासाठी दिल्लीतून मुंबईत आला. अखेर त्याच्यावर प्रोड्यूसप विविक वासवानी यांची नजर पडली आणि त्यांनी त्याला जीपी सिप्पींकडे नेत चित्रपटांच्या ऑफर दिल्या. त्यानंतर मात्र शाहरुखने मागे वळून पाहिलं नाही. त्याने त्याच्या करियरमध्ये एक सो एक चित्रपट करत सुपरस्टार होण्यापर्यंतचा प्रवास केला.

हेही पाहा- घराणेशाहीला फाट्यावर मारत बॉलिवूडमध्ये हिट झालेले ऍक्टर्स

सुशांत सिंग राजपूत
याच यादीतलं दुसरं नाव म्हणजे सुशांत सिंग राजपूत. खरंतर सुशांतच्या निधनानंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीवरील चर्चांनी बराच जोर धरला होता. असो, सुशांतबद्दल सांगायचं झालं तर पवित्र रिश्ता या मालिकेतून ओळख मिळवलेल्या सुशांतने नंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याने काय पो छे, छिछोरे, एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी, केदारनाथ अशा चित्रपटात का करत आपली छाप पाडली, पण २०२० साली त्याचे निधन झाले.

कंगना रणौत
अभिनेत्री कंगणा रणौत नेहमीच अनेक वादांमुळे चर्चेत येत असते. विशेष म्हणजे अभिनय क्षेत्रातील घराणेशाहीवर कंगणाने अनेकदा भाष्य करत मतं मांडली आहेत. तिने वयाच्या सोळाव्या वर्षी तिच्या करियरला सुरुवात केली. मनालीच्या जवळील भांबळा येथे जन्मलेल्या कंगणाने अनेक हिट चित्रपट केले आहेत. तिला फॅशन, क्वीन, तनु वेड्स मनू रिटर्न आशा चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळवले.

इरफान खान
इरफान खान देखील बॉलिवूड मध्ये नाव कमावलेलं एक नाव. इरफान खानचा प्रवास टेलिव्हिजन मालिकांपासून सुरू झाला होता, पण त्याच्या मेहनतीच्या जोरावर त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आणि आपली नवी ओळख बनवली. त्याचे द लंचबॉक्स, पिकू, हिंदी मिडीयम, अंग्रेजी मिडीयम असे अनेक चित्रपट कायमचेच चाहत्यांच्या लक्षात राहातात. त्याने केवळ बॉलिवूडमध्येच नाही, तर हॉलिवूडमध्येही आपली छाप पाडली, पण हा प्रतिभाशाली अभिनेता २०२१ मध्ये निरोप घेत अनंतात विलीन झाला.

विद्या बालन
बॉलिवूडमध्ये नाव कमावलेल्या आऊटसायडर्समध्ये अभिनेत्री विद्या बालनही आहे. तिलाही या क्षेत्रात नाव कमावण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागली. तिने काही बंगाली, दाक्षिणात्य चित्रपट केले, तसेच तिने प्रसिद्ध मालिका हम पांचमध्येही काम केले. या मालिकेतील तिच्या भूमिकेने चाहत्यांची मनं जिंकली, पण तिला करियरमध्ये मोठा ब्रेकथ्रू दिला तो परिनीता चित्रपटाने. त्यानंतर तिने अनेक हिट चित्रपटात काम केलं. आज अक्षय कुमार खिलाडी म्हणून प्रसिद्ध आहे, पण त्यालाही आपली ओळख मिळवण्याआधी बरेच कष्ट घ्यावे लागले. तो थायलंडमधील हॉटेलमध्ये काम करत होता, पण नंतर त्याने अभिनय क्षेत्रात येत ऍक्शन चित्रपटांसह कॉमेडी चित्रपट गाजवले. आता तो सामाजिक संदेश देणाऱ्या अनेक चित्रपटांमध्येही दिसतो.

आयुषमान खुराना
बधाई हो, अंधाधुंद, शुभमंगल सावधान असे वेगेवेगळ्या विषयावरील चित्रपटात काम करत आपली छाप पाडणारा अभिनेता म्हणजे आयुषमान खुराना. रेडिओ जॉकी म्हणून करियरची सुरुवात करणाऱ्या आयुषमानने हळूहळू प्रगती करत बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. त्याने केवळ अभिनयानेच नाही, तर आपल्या गाण्यांमधूनही स्वत:ची जागा या इंडस्ट्रीमध्ये निर्माण केली.

नवाझुद्दीन सिद्दीकी
सध्या बॉलिवूडमध्ये गाजत असलेलं नाव म्हणजे नवाझुद्दीन सिदीक्की. एका शेतकऱ्याचा मुलगा ते दिग्गज अभिनेता होण्यापर्यंतचा नवाझुद्दीन सिदक्कीचा प्रवास झाला. या दरम्यान त्याने केमिस्ट म्हणून काम केलं. तसेच, तो दिल्लीला वॉचमनच्या नोकरीसाठीही आला होता. त्याने नाटक, मालिकांमध्येही काम केले. अखेर त्याने आपल्या कलेच्या जोरावर आपली ओळख बनवलीच. त्याच्या गँग्स ऑफ वासेपूर, पिपली लाईव्ह, कहानी, ब्लॅक फ्रायडे अशा चित्रपटांमधील भूमिका लक्षात राहतात.

प्रियांका चोप्रा
बॉलिवूड-हॉलिवूडमध्ये नाव गाजवलेली अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. मिस वर्ल्डचा किताब जिंकलेली प्रियांकालाही स्ट्रगल करावा लागला, पण तिने अंदाज चित्रपट केला आणि ती हिट झाली, त्यानंतर मात्र तिने मागे वळून पाहिलेच नाही. आज ती सर्वात यशस्वी भारतीय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्याव्यतिरिक्त अनु्ष्का शर्माही तशी बॉलिवूडमध्ये आऊटसायडरच. मॉडेलिंग क्षेत्रात काम करत असतानाच तिच्या मॅनेजरने तिला अभिनयात हात आजमण्याचा सल्ला दिला अन् तिने अभिनेत्री म्हणून आपली ओळख निर्माण करण्यात यश मिळवले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा