Thursday, March 28, 2024

सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचे निधन, कमी वयात घेतला अखेरचा श्वास

सिनेसृष्टीतून काळीज तोडणारी बातमी समोर येत आहे. मराठी सिनेमे आणि मालिकांमध्ये काम करणारे प्रसिद्ध अभिनेते अरविंद धनू यांचे सोमवारी (दि. २५ जुलै) निधन झाले. ते ४७ वर्षांचे होते. त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तिथेच त्यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका आला आणि त्यांना देवाज्ञा झाली.

अरविंद धनू यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनावर चाहते शोक व्यक्त करत आहेत. आपल्या दमदार अभिनयासाठी तसेच आव्हानात्मक भूमिकांसाठी ते प्रसिद्ध होते.  अरविंद यांनी ‘लेक माझी लाडकी’, तसेच स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ अशा गाजलेल्या मालिकांमध्ये काम केले आहे. त्याचबरोबर ‘क्राईम पट्रोल’ मालिकेतील त्यांची पोलिस अधिकाऱ्याची भूमिकाही प्रचंड गाजली होती. याच भूमिकांनी त्यांना सिने जगतात नवी ओळख मिळवून दिली.

या गाजलेल्या मालिकांसोबतच अरविंद धनू यांनी  ‘एक होता वाल्या’ या मराठी सिनेमात काम केले होते.

हेही वाचा –

सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचे निधन, कमी वयात घेतला अखेरचा श्वास

कोट्यवधी रुपयांचे मालक असूनही ‘या’ ५ अभिनेत्यांचे पाय मात्र जमिनीवरच, एक तर कमाईच्या ९० टक्के करतो दान

जेव्हा १०-१५ लाखात बनायचे सिनेमे, तिथं दीड कोटीत बनला होता चित्रपट, कमाई तब्बल १६४४ कोटी

हे देखील वाचा