Saturday, July 27, 2024

महाराष्ट्र भुषण आशोक सराफांनी दिली पहिली प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाले.

मराठी सिनेसृष्टीतील अष्टपैलु कलाकार, ज्यांचे चाहते संपुर्ण महाराष्ट्रातंच नाही तर महाराष्ट्राबाहेरही आहेत. त्यांनी मराठी इंडस्ट्रीला अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत. फक्त चित्रपटातंच नाही तर आशोक सराफांनी नाटकांतही काम केले आहे. आशोक (Ashok Saraf)सरांनी त्यांच्या अभिनयातुन कित्तेक चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. अशा या सिनेसृष्टीतील सर्वांच्या लाडक्या आणि आदरणीय आशोक सराफांना ‘महाराष्ट्र भुषण पुरस्कार ‘ जाहीर झाला. जेव्हापासुन हे जाहीर झाले, सर्व स्थरांवर त्यांचे अभिनंदन केले जात आहे. काल 30 जानेवारीला, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या ऑफिशिएल एक्स हँडलवरून आशोक सराफ यांचे अभिनंदन केले. यावर आशोक सराफ सरांनी आज पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

आशोक सराफांना पुरस्कार जाहीर झाल्यापासुन सर्वांकडुन शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्यांनी आज एका वृत्तवाहिनीला बोलताना या पुरस्काराबाबत त्यांच्या भावना व्यक्त केल्या.यावेळी त्यांनी त्यांचा आनंद व्यक्त करत. माध्यमांना मिश्र भावना असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले आशोक सराफ?
नुकताच महाराष्ट्र भुषण पुरस्कार(Maharashtra Bhushan Award) जाहीर झालेल्या आशोक सराफ एका वृत्तवाहिनीला बोलताना म्हणाले,”मला एवढ्या लवकर महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळेल असं वाटलं नव्हतं किंवा मला माझं काम तेव्हढंही वाटत नव्हतं. मला महाराष्ट्र भूषण पुरस्काराने दिग्गजांच्या पंक्तीला येऊन बसवलं आहे. त्यामुळे मी निशब्द झालोय. कारण आतापर्यंत ज्यांना पुरस्कार मिळालाय ते थोर लोक आहेत. त्यामुळे मी काहीतरी केलं आहे याची मला आता जाणीव व्हायला लागलीय. तुम्ही मला ती जाणीव करून दिली हे मी कधीच विसरणार नाही.” ”

ते पुढे म्हणाले, “मी खूप भारावून गेलो आहे. या सगळ्यामुळे मला आता काहीतरी चांगलं आणि वेगळं करायचं आहे याची जाणीव झाली आहे. मी आता निवडकपणे काम करत आहे. पण, नक्कीच मी काम करत राहीन. तूम्ही माझे आहात आणि मी तुमचा आहे. मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही. म्हणून काम करावेच लागेल.”

दरम्यान, अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांची पत्नी अभिनेत्री निवेदिता सराफ यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. “हे मी निवेदितांना सांगितल्यावर त्या आनंदाने ओरडल्या”, असेही अशोक सराफ म्हणाले. याबाबत निवेदिता(Nivedita saraf) यांनाच पहिला फोन आला होता. ती आनंदाने किंचाळली. असे अशोक सराफ यांनी सांगितले. यावेळी त्यांनी निवेदिता सराफ यांचेही आभार मानले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Ashok Saraf | ‘व्याख्या,विख्खी, वुख्खू’ हे तीन शब्द चित्रपटात आले कसे? खुद्द अशोक सराफ यांनी सांगितला किस्सा
Ashok Saraf | ‘कोणी गुरू नसला, तरीही अनेकांकडून मी शिकत गेलो’, ‘पिफ’मध्ये रंगली अशोक सराफ यांच्या गप्पांची मैफल

हे देखील वाचा