Sunday, December 3, 2023

‘व्याख्या,विख्खी, वुख्खू’ हे तीन शब्द चित्रपटात आले कसे? खुद्द अशोक सराफ यांनी सांगितला किस्सा

आजवरच्या चित्रपटांच्या मोठ्या आणि अलौकिक इतिहासात अनेक एकापेक्षा एक सरस सिनेमे आले. मराठी मनोरंजनविश्वात तर 80/90 चा काळ हा खरी अर्थाने विनोदी चित्रपटांनी गाजवला. लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे, सचिन आदी कलाकारांनी त्याच्या चित्रपटांनी प्रेक्षकांना तुफान हसवले. आजही हे चित्रपट बघताना कधीच कंटाळा आला नाही. अनेक चित्रपटांमध्ये तर हे सर्व कलाकार सोबतच दिसले होते. लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे या तिकडीचा तुफान गाजलेला सिनेमा म्हणजे ‘धुमधडाका’. अतिशय लोकप्रिय आणि प्रसिद्ध झालेल्या या सिनेमाने त्या काली अमाप लोकप्रियता मिळवली. अशातच आज म्हणजेच 4 जून रोजी अशोक सराफ त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत.  

या सिनेमातील कलाकारांचा अभिनय, संवाद तुफान गाजले. असाच एका तुफान गाजलेला एक संवाद म्हणजे ‘व्याख्या,विख्खी, वुख्खू’. तसे पाहिले तर हा संवाद नाहीच आहे मुली. केवळ तीन साधे शब्द अशोक सराफ यांनी त्यांच्या अनोख्या स्टाईलने अजरामर केले. आजही हे शब्द वेगवगेळ्या पद्धतीने तरुणांमध्ये बोलताना ऐकले जातात. एवढेच नाही तर हे तीन शब्द असलेले टीशर्ट देखील तरुणाईमध्ये लोकप्रिय झाले होते. सोशल मीडियावरही हे शब्द गाजताना दिसतात. मात्र अनेकांना प्रश्न पडतो की, हे शब्द संवाद लेखकाला सुचले कसे? हे शब्द नक्की आले कोणाच्या डोक्यातून? यावरच स्वतःच अशोक सराफ यांनीच एका मुलाखतीमध्ये उत्तर दिले होते.

त्यांनी सांगितले की, “धुमधडाका या चित्रपटात मी महेशच्या मित्राची आणि त्याच्या वडिलांची अशी दुहेरी भूमिका साकारली होती. एका सीनमध्ये मला महेशचे वडील बनून त्याच्या मैत्रिणीच्या वडिलांच्या अर्थात धनाजी वाकडे यांच्या घरी जायचे असते. मी त्यांच्या घरी पोहचतो आणि धनाजी वाकडे यांच्या बंगल्याबाहेर गाडी थांबवल्यानंतर मोठ्या ऐटीत पाइप स्मोकिंग करत तिथे असणाऱ्या माळीला विचारतो, मालक कुठे आहेत त्यावर मीच मालक आहे, असे उत्तर आल्यानंतर त्यांच्या या उत्तरावर गोंधळून गेलेल्या मला काय बोलावे हे सुचत नव्हते आणि त्यामुळे मी मुद्दामच असा खोकल्यासारखा आवाज काढला. पण चुकून माझ्या तोंडून आलेले हे तीन शब्द इतके गाजतील असे कधीही वाटले नव्हते.”

या चित्रपटात अशोक सराफ यांच्यासह महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, निवेदिता सराफ, शरद तळवलकर, प्रेमा किरण आदी तगड्या कलाकारांची फौज दिसली होती.(actor ashok saraf birthday talk about his dhum dhadaka movie vikhi vukhu vyakhya)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
इश्क का रंग सफेद! साराचे प्रेमात पाडणारे फोटोशूट, एकदा पाहाच
बापरे! ‘तो लग्न करण्यासाठी पैशाची थैली घेवून आला होता…’, रिंकूच्या प्रेमात सैराट झालेल्या चाहत्याचा किस्सा

हे देखील वाचा