बॉलिवूड सिनेसृष्टी असो किंवा मराठी सिनेसृष्टी, त्यातील अनेक कलाकार सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमुळे अडचणीत सापडत असतात. असेच काहीसे मराठमोळा अभिनेता मयूरेश कोटकरसोबत झाले. त्याने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल मागील आठवड्यात आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केली होती. यानंतर त्याच्याविरुद्ध केलेल्या तक्रारीनंतर त्याला रविवारी (१३ जून) रात्री अटक करण्यात आली होती. यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र, आता त्याला जामीन मिळाल्याचे वृत्त आहे. (Marathi Actor Mayuresh Kotkar Got Bail After Two Days Arrest For Using Defamatory Words Against Minister Eknath Shinde And His Parents)
मयूरेश हा मराठी चित्रपटसृष्टी आणि टीव्ही मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाबाबत आक्षेप घेतला होता. असे म्हटले जात आहे की, मयूरेशने एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल आक्षेपार्ह गोष्टी बोलल्या होत्या.
Maharashtra: Thane's Srinagar police arrested Marathi artist Mayuresh Kotkar for allegedly posting an objectionable statement on social media against state minister Eknath Shinde. He has been sent to judicial custody. Police complaint in this regard was filed by Shiv Sena workers
— ANI (@ANI) June 15, 2021
या प्रकरणावर घेतला होता आक्षेप
मयूरेशला भारतीय दंडसंहितेच्या ५०५ कलमानुसार अटक करण्यात आली होती. मयूरेशने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव बदलून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव ठेवण्यावर आक्षेप घेतला होता. मात्र, त्याने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आई- वडिलांबाबत अपमानास्पद शब्दांचा वापर केला होता.
यावर शिवसेनेचे नगरसेवक योगेश जानकर यांनी पुढे येऊन मयूरेशविरुद्ध तक्रार नोंदवली. त्यांनी म्हटले की, “मला बोलण्याच्या स्वातंत्र्याची जाणीव आहे, परंतु कोणत्याही व्यक्ती किंवा त्याच्या कुटुंबाबाबत अपमानास्पद शब्दांचा वापर करणे, या गोष्टींचा स्वीकार केला जाणार नाही. सोशल मीडियावर चर्चा करणे आणि काही पोस्ट करण्यासाठी मर्यादा असल्या पाहिजेत. त्यामुळे मी पुढे येऊन श्रीनगर पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.”
खरं तर नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माजी खासदार दि. बा. पाटील यांचे नाव देण्यावरून जोरदार चर्चा सुरू आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘लगान’ला २० वर्ष पूर्ण; ‘लाल सिंह चड्ढा’च्या या हटके लुकमध्ये आमिर खानने मानले चाहत्यांचे आभार