‘लगान’ला २० वर्ष पूर्ण; ‘लाल सिंह चड्ढा’च्या या हटके लुकमध्ये आमिर खानने मानले चाहत्यांचे आभार


भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासात असे अनेक सिनेमे आहेत ज्यांनी लोकप्रियतेच्या बाबतीत इतिहास रचला. आजच्या काळात देखील असे खूप मोजके सिनेमे असतील ज्यांनी अशी लोकप्रिय मिळवली. आज बरोबर २० वर्षांपूर्वी म्हणजे १५ जून २००१ ला एक असाच भारतीय चित्रपटांचा चेहरा मोहरा बदलवणारा एक सिनेमा प्रदर्शित झाला होता, आणि तो सिनेमा म्हणजे ‘लगान’.

आज या चित्रपटाला प्रदर्शित होऊन २० वर्ष पूर्ण झाली. हा सिनेमा म्हणजे आमिर खान प्रोडक्शनचा पहिला सिनेमा, म्हणजेच सिनेमासोबतच आमिर खान प्रोडक्शनला देखील २० वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने सिनेमातील मुख्य अभिनेता असलेल्या आमिर खानने एक व्हिडिओ शूट केला असून, हा व्हिडिओ आमिरच्या कंपनीने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये आमिर खान आर्मी ऑफिसरच्या वेशभूषेत दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये आमिरने लगानला २० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. या चित्रपटाला इतके भरभरून प्रेम दिल्याबद्दल प्रेक्षकांना त्याने धन्यवाद म्हटले आहे. सोबतच त्याने हे देखील सांगितले की, आज तो सिनेमाच्या टीमला व्हिडिओ कॉल करून त्यांच्यासोबत गप्पा देखील मारणार आहे. आज सोशल मीडियावर #MyLagan हा हॅशटॅग ट्रेंड होत असून, सिनेमाचे चाहते, आमिरचे चाहते सोशल मीडियावर त्यांच्या या चित्रपटाशी संबंधित आठवणी सांगत आहेत. (aamir khan video for 20 years of lagaan in lal singh chaddha look)

आमिरचा व्हिडिओमधील लुक पाहून अनेकांना प्रश्न पडला असेल की, हा कोणत्या सिनेमाचा लुक आहे. तर आगामी बहुप्रतीक्षित ‘लाल सिंग चड्ढा’ सिनेमातील आमिरचा हा लुक आहे. या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान आमिरने हा व्हिडिओ शूट करत सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

आमिरचा ‘लगान’ हा सिनेमा भारतीय सिनेसृष्टीतील आयकॉनिक सिनेमा म्हणून ओळखला जातो. हा सिनेमा प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये देखील नामांकित झाला होता. मुख्य म्हणजे ‘लगान’ आणि ‘गदर’ हे दोन मोठे सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित होऊनही सुपरहिट ठरले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

भन्नाटच! कियारा आडवाणी बनलीय ‘स्टंट गर्ल’, एकाच किकमध्ये उडवली समोरच्या व्यक्तीच्या डोक्यावरील टोपी

-कॅन्सर पीडित व्यक्तीने भावुक होऊन धरले थेट सोनू सूदचे पाय, अभिनेत्याने दिली ‘अशी’ रिऍक्शन

-‘इंडियन आयडल’मधील स्पर्धकाचे गाणे ऐकून अनु मलिक यांनी स्वत:लाच मारली होती थोबाडीत; जुना व्हिडिओ व्हायरल


Leave A Reply

Your email address will not be published.