Monday, July 1, 2024

मराठी सिनेसृष्टीवर दु:खाचा डोंगर! अभिनेत्याने कमी वयात सोडलं जग

कलाविश्वातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. मराठी सिनेसृष्टीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेता मिलिंद पेमगिरीकर याचे बुधवारी (दि. 16 ऑगस्ट) निधन झाले. मिलिंद फक्त 45 वर्षांचा होता. अभिनेता मागील काही काळापासून गंभीर आजाराचा सामना करत होता. मिलिंदने ‘बाजी’ या मराठी मालिकेत सरदार बिनीवाले हे पात्र साकारले होते. अशात त्याच्या निधनामुळे मराठी कलाविश्वाचे मोठे नुकसान झाले आहे. मिलिंदची जागा कुणीही भरू शकणार नाही.

कधी झाले निधन?
मिलिंद पेमगिरीकर (Milind Pemgirikar) याचे निधन 16 ऑगस्ट रोजी रात्री 9.30च्या दरम्यान झाले होते. मिलिंदने काम केलेली ‘बाजी’ ही मालिका सतराव्या शतकातील सत्य कथेवर आधारित होती. मिलिंदने याव्यतिरिक्त इतर मालिकांमध्येही काम केले होते. त्यामध्ये मिताली मयेकर अभिनित ‘लाडाची मी लेक गं’ या मालिकेचाही समावेश आहे. तसेच त्याने मराठी चॅनेलवरील ‘सिंधू’ मालिकेतही भूमिका बजावली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Pemgirikar (@milindpemgirikar)

मिलिंदविषयी थोडक्यात
वयाच्या 45व्या वर्षी प्राण सोडणारा मिलिंद इंदोरच्या रामबाग येथे जन्मला होता. त्याला बालपणापासूनच अभिनयात रस होता. विशेष म्हणजे, तो मोठे बंधू आणि अनुभवी रंगकर्मी मनोज पेमगिरीकर यांचा आश्रित होता. मध्यमवर्गीय कुटुंबातून येणारा मिलिंद बालपणापासूनच थिएटरमध्ये (नाट्यक्षेत्र) सक्रिय होता. त्याने रामबाग येथील स्मृती शेष नाना दुर्फेयांच्या कडून नाट्यातील महत्त्वाच्या गोष्टी शिकल्या होत्या. महत्त्वाचं म्हणजे, मिलिंद हा इंदोरचा असा पहिलाच अभिनेता होता, ज्याने कमी कालावधीत अफाट यश मिळवले होते.

महत्त्वाच्या बातम्या-
आयुर्वेदाचार्य ते अभिनेता, ‘असा’ आहे गिरीश ओक यांचा जीवनप्रवास
गुलजार यांना गॅरेजमध्ये काम करताना मिळाली बॉलिवूडमध्ये संधी, मेकॅनिक ते गीतकार असा आहे प्रवास

हे देखील वाचा