Monday, July 1, 2024

Shriram Lagoo Birth Anniversary | आठवण नटसम्राटाची, श्रीराम लागू यांच्या आयुष्यातील हे किस्से तुम्हाला नक्की ठाऊक नसतील

आपल्या अभिनयाने आणि बुद्धिवादी विचारांनी मराठी जनमानसावर ठसा उमटवलेले अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांची बुधवारी (16 नाेव्हेंबर)ला जयंती आहे. त्यानिमित्ताने या नटसम्राटाच्या जीवनकार्याचा घेतलेला आढावा.

कोणत्याही भुमिकेला आपल्या कसदार अभिनयाची आणि जाणत्या बुद्धिची जोड देत त्या भुमिकेला पडद्यावर अजरामर करण्यात डॉ. श्रीराम लागू (Dr. Shreeram Lagoo) यांचा हातखंडा होता. याच जोरावर त्यांनी अभिनय क्षेत्रात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले होते. एक कसलेला अभिनेता यासह ते लेखक आणि विचारवंतही होते.

डॉ. श्रीराम बाळकृष्ण लागू यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1927 मध्ये सातारा येथे झाला. त्यांचं शालेय शिक्षण पुण्यातील भावे हायस्कूलमध्ये झालं. त्यानंतर त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात आणि बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेतले. 1950 च्या दशकात त्यांनी कान, नाक, घसा यांच्या शस्त्रक्रियांचं प्रशिक्षण घेतलं आणि पुण्यात पाच वर्ष कामही केलं. त्यानंतर ते कॅनडा आणि इंग्लंडला पुढील शिक्षणासाठी गेले.

1960 च्या दशकात पुणे आणि टाबोरा, टांझानिया येथे त्यांचा वैद्यकीय व्यवसाय सुरु होता. त्यानंतर 1969 मध्ये त्यांनी वैद्यकीय क्षेत्र सोडून पूर्णपणे नाटकात काम करण्यास सुरुवात केली. पुण्यातील पी.डी.ए. या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी नाटकात काम करण्यास सुरुवात केली. डॉ. श्रीराम लागू यांनी मराठी चित्रपटसृष्टीसह हिंदीतही आपल्या कसदार अभिनयाची छाप सोडली. अभिनयासह त्यांनी दिग्दर्शनही केलं.

वसंत कानेटकर लिखित ‘इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकापासून त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या ‘नटसम्राट’ या नाटकात त्यांनी प्रमुख भूमिका केली. त्यानंतर त्यांनी अनेक नाटकांमध्ये, मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला. शांताराम बापूंच्या ‘पिंजरा’ या सिनेमातील लागूंच्या अभिनयानं तर त्यांना घराघरात नेलं.

‘पिंजरा’ सिनेमातील त्यांच्या अभिनयाने ते यशाच्या शिखरावर पोहोचले. ‘पिंजरा’ व्यतिरिक्त त्यांचे ‘सामना’, ‘सिंहासन’, ‘मुक्ता’ हे सिनेमेही चांगलेच गाजले. अभिनयाशिवाय डॉ. श्रीराम लागू यांनी अनेक नाटकांचे दिग्दर्शनही केले.

श्रीराम लागू यांना त्यांच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कार मिळाले. अभिनयासोबतच लागू यांनी अनेक पुस्तकंही लिहीली. त्यात झाकोळ, रूपवेध, लमाण या पुस्तकांचा समावेश आहे. त्यांनी वेळोवेळी तत्कालीन सामाजिक राजकीय विषयांवर लेखही लिहिले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘भगव्या’ रंगाच्या बोल्ड ड्रेसमध्ये सनी लिओनीने लावली पाण्याला आग, पाहाच व्हायरल व्हिडिओ
‘बेशरम रंग’ गाण्याची गायिका स्पष्टच म्हणाली, ‘कपड्यांपेक्षा जास्त…’

हे देखील वाचा