Friday, May 24, 2024

‘नटसम्राट’ नाटकादरम्यान श्रीराम लागूंना आला होता हृदयविकाराचा झटका, वयाच्या 42 व्या वर्षी धरली अभिनयाची वाट

हिंदी तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते म्हणजे श्रीराम लागू होय. बुधवारी (16 नोव्हेंबर) रोजी त्यांची जयंती. श्रीराम यांचा जन्म 16 नोव्हेंबर, 1927 मध्ये झाला होता. लहान असल्यापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. त्यांनी ही आवड पुणे आणि मुंबईमध्ये शिक्षण घेताना जोपासली. अभ्यासातही चांगले हुशार असल्याने त्यांनी मेडिकल हे क्षेत्र निवडले. डॉक्टर झाल्यानंतर त्यांनी अनेक देशात प्रवास केला. एक डॉक्टर म्हणून काम करत असताना देखील त्यांचे मन अभिनयातच होते. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांच्याबाबत थोडक्यात जाणून घेऊया…

दोन दशकांपेक्षा जास्त काळ लागूंनी डॉक्टर म्हणून काम केले. मात्र, वयाच्या 42 व्या वर्षी त्यांनी अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. 1969 मध्ये त्यांनी थिएटरमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांना सर्वोत्कृष्ट कलाकार या नावानेच सर्वत्र ओळखायचे. त्यांनी 20 पेक्षाही जास्त मराठी नाटकांचे दिग्दर्शन केले आहे. ‘नटसम्राट’ या लोकप्रिय नाटकात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली होती, ज्यामुळे त्यांना मराठी थिएटरचा मैलाचा दगड म्हणून ओळखले जाते. (Shriram lagoo birthday special, let’s know about his life)

‘नटसम्राट’ या नाटकात त्यांनी गणपत बेलवलकर यांची भूमिका निभावली होती. त्याचे हे पात्र खूप अवघड मानले जाते. हे पात्र निभावलेली अनेक कलाकार आजारी पडले होते. हे पात्र निभावताना त्यांना देखील हृदयविकाराचा झटका आला होता.

हिंदी तसेच मराठी चित्रपटसृष्टीत त्यांचे मोलाचे योगदान आहे. 1977 मध्ये आलेल्या ‘घरौदा’ या चित्रपटात वयस्कर बॉस हा त्याच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका मुलीसोबत लग्न करतो. त्याचे हे पात्र सर्वांच्या लक्षात राहणारे आहे. या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहअभिनेता म्हणून फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.

श्रीराम लागू यांचे चित्रपट
श्रीराम लागू यांच्या चित्रपटांबाबत बोलायचं झालं, तर त्यांनी ‘पिंजरा’, ‘सामना’, ‘कलार’, ‘एक दिन आश्चर्य’, ‘लावारीस’, ‘दो और दो पांच’, ‘आँखे’, ‘खुद्दर’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘मवाली’, ‘घर द्वार’, ‘सम्राट’, ‘राज’, ‘मकसद’ अशा अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आदित्य रॉय कपूरला डेट करतेय क्रिती सेनन? करण जोहरनेही सांगून टाकलं, ‘मी तुम्हाला कोपऱ्यात…’

काय सांगता! अनन्या पांडे आदित्य राॅयला करतेय डेट?

हे देखील वाचा