Wednesday, March 18, 2026
Home अन्य धक्कादायक! नाटकापूर्वीच सागर कारंडे रुग्णालयात दाखल, सेटवर घडलं तरी काय?

धक्कादायक! नाटकापूर्वीच सागर कारंडे रुग्णालयात दाखल, सेटवर घडलं तरी काय?

मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या‘ फेम सागर कारंडे याने आपल्या धमाकेदार कॉमेडीने प्रेक्षकांना पोट धरुन हसण्यास भाग पाडला आहे. त्याने अनेक चित्रपटामध्येही महत्वाच्या भूमिका निभावल्या आहेत. सगळ्यांना खळखळून हसवणाऱ्या अभिनेत्यासोबत नुकतीच एक धक्कादायक घटना घडली आहे.

‘चला हाव येऊ द्या’ फेम सागर कारंडे (Sagar Karande) याने आपल्या नाटकाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मराठी नाटककार आणि रसिकप्रेक्षकांचे नाटकावर प्रचंड प्रेम आहे. काही कलाकार आपल्या तब्येतीची काळजी न करता एक एक दिवस जास्त प्रयोग करत असतात, आणि त्याच्यामुळे त्यांच्या प्रतिकृतीवर परिणाम होतो. असंच काही सागर सोबत घडलं आहे. त्याने नुकतंच फेसबुकवर लाइव्ह येऊन घडलेल्या घटनेबद्दल पूर्ण माहिती शेअर केली आहे.

अभिनेता सागर कारंडेसोबत (दि, 20 नोव्हेंबर) रोजी अचानकच त्याच्या छातीमध्ये दु:खू लागले आणि त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याच दिवशी सागरचा साडे चार वाजता मराठी साहित्य संघाला ‘हीच तर फॅमिलीची गम्मत’ या नाटकाचा प्रयोग होता. आणि त्याच दिवशी दुपारी 2 वाजता सागरची तब्येत बिघडली होती. सागर नाटक करण्याच्या परिस्थितीमध्ये नव्हता आणि दुसरीकडे वेळेच्या कारणामुळे नाटक रद्दही करता येत नव्हते. नाटक अशा समस्येत सापडले होते म्हणून अचानकच त्याच्यावर उपाय म्हणून ‘वासूची सासू’ या नाटकाचा प्रयोग करण्याचे जाहीर केले आणि नाटक यशस्वा ठरले.

‘वासूची सासू’ या नाटकामधील सर्व कलाकारांना सागरच्या तब्येतीबद्दल समजल्यानंतर सगळेच धावतपळत नाटकाच्या प्रयोगासाठी आले आणि प्रयोग यशस्वी झाला . या घटनेची पुर्ण माहिती सागरने सोशल मीडियाद्वारे सांगितली आहे. सागरची तब्येत आता ठीक आहे. शुटींगमुळे आणि कामामध्ये व्यस्त असल्यामुळे जेवन वोळेनुसार न केल्यामुळे त्याला अॅसिडीटीचा त्रास झाला आणि त्याच्यामुळे तब्येत बिघडली होती. मात्र, आता तो ठिक आहे. त्याचे दवाखाण्यातील सर्व रिपोर्टही नॉर्मल आले आहेत. सांगायचे म्हणजे मराठी कलाकार कोणत्याही परिस्थितीत एकमेकांच्या मदतीला धवतपळत येतात. कामामध्ये एकमेकांचे सहकार्य करतात हे पुन्हा एकदा या घटनेमुळे सिद्ध झाले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॉलिवूडमधील ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकाचा सनी देओलवर फसवणुकीचा आरोप! 26 वर्षापूर्वीची घटना
अंगावर शहारे आणणारा संजय मिश्रा, नीना गुप्ता यांच्या ‘वध’चा ट्रेलर; सिनेप्रेमींना आठवलं ‘श्रद्धा हत्याकांड

हे देखील वाचा