कोट्यवधींची कमाई करणारा ‘हा’ मराठीमधील दिग्गज अभिनेता आजही घेतो आई बाबांकडून खर्चाला पैसे

मराठी चित्रपट जगतात असे अनेक अभिनेते आहेत, ज्यांच्या चित्रपटांची स्टारडमची नेहमीच चर्चा होत असते. आपल्या दमदार अभिनयाने या कलाकारांनी मराठी चित्रपट जगतात आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. या यशस्वी अभिनेत्यांच्या यादीत स्वप्निल जोशीचे( Swapnil Joshi) नाव प्रामुख्याने घेतले जाते. स्वप्निल जोशी हा मराठी चित्रपट जगतातील लोकप्रिय अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहे. मराठीसोबतच हिंदीमध्ये देखील लोकप्रिय असणाऱ्या स्वप्निलने अनेक हिंदी मराठी मालिकांमध्ये काम केले आहेत. यशाच्या उंच शिखरावर असलेल्या या अभिनेत्याने अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत तो येणार्‍या पैशाच नियोजन कस करतो याचे सुंदर उत्तर दिले आहे जे ऐकून प्रत्येकाला अभिमान वाटेल. नक्की काय म्हणाला आहे हा अभिनेता चला जाणून घेऊ.

‘दुनियादारी’, ‘मितवा’, ‘प्यार वाली लव स्टोरी’ अशा गाजलेल्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारा स्वप्निल जोशी हा लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. क्यूट लूक आणि दमदार अभिनय यामुळे मराठी चित्रपट क्षेत्रातील रणबीर कपूर अशी खास ओळख या अभिनेत्याबद्दल सांगितली जाते. मराठी चित्रपट जगतातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता अशीही स्वप्निल जोशीची खास ओळख आहे.

View this post on Instagram

A post shared by Swapnil Joshi (@swwapnil_joshi)

मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाने सर्वांना वेड लावल्यानंतर त्याने छोट्या पडद्यावर लक्ष केंद्रित केले आहे. आता लवकरच स्वप्निल जोशी ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत भूमिका साकारताना दिसणार आहे. याआधी या मालिकेचे प्रमोशन करण्यासाठी संपूर्ण टीम किचन कलाकार कार्यक्रमात दाखल झाली होती. ज्यामध्ये त्याने अनेक प्रश्नांची मनमोकळी उत्तरे दिली आहेत. या कार्यक्रमाचा प्रोमो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Swapnil Joshi (@swwapnil_joshi)

या कार्यक्रमात स्वप्निलला अनेक मजेशीर प्रश्न विचारण्यात आले. त्यावर स्वप्निलनेही आपल्या खास शैलीत तितकीच मजेशीर उत्तरे दिली आहेत. यावेळी स्वप्निलला “तू खर्च करतोस का?” असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना स्वप्निलने” ही गोष्ट साफ खोटी आहे. मला पहिल्यापासून घरच्यांनी पैशाचे नेमके नियोजन करण्याचे संस्कार दिल्याने मी सगळे पैसे घरी देतो” असे उत्तर दिले आहे. इतकेच नव्हे तर मला पाहिजे तेव्हा मी त्यांच्याकडून पैसे मागून घेतो असेही तो यावेळी म्हणाला. स्वप्निल च्या उत्तराने सगळेच खुश झाल्याचे या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. सध्या हा प्रोमो चांगलाच चर्चेत आला आहे. दरम्यान अभिनेता स्वप्निल जोशी ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातही झळकत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

 

Latest Post