Saturday, June 29, 2024

मस्तच! अभिनेता संकर्षण कऱ्हाडेला झालं जुळं; महिन्याभरानंतर पोस्ट करून दिली आनंदाची बातमी

या वर्षी चित्रपटसृष्टीतून अनेक आनंदाच्या बातम्या समोर येत आहेत. लॉकडाऊनमध्ये काम बंद होते, त्यामुळे कलाकारांनी त्यांचा सगळा वेळ त्यांच्या कुटुंबासोबत घालवला आहे. या वर्षी अनेकांच्या घरात सनई चौघडे वाजले आहेत, तर अनेकांच्या घरात लहान पाहुण्यांचे आगमन झाले आहे. अशातच मराठी अभिनेता आणि होस्ट संकर्षण कऱ्हाडे याच्या घरात देखील असाच काहीसा आनंद पाहायला मिळत आहे. संकर्षण या वर्षी बाबा झाला आहे. पण त्याच्यासाठी हा दुप्पट आनंद आहे. कारण त्याला जुळं झालं आहे. संकर्षणला एक मुलगा आणि मुलगी झाली आहे. याची माहिती त्याने सोशल मीडियावर दिली आहे.

संकर्षणने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून त्याच्या नुकत्याच जन्मलेल्या मुलांसोबत फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करून त्याने त्याच्या मुलांची नावं देखील सांगितली आहेत. तसेच त्याने त्याच्या मुलांच्या नावाचे अर्थ देखील सांगितले आहेत. त्याने कॅप्शन दिले आहे की, “चि. सर्वज्ञ संकर्षण कऱ्हाडे. कु. स्रग्वी संकर्षण कऱ्हाडे. (सर्वज्ञ : सर्व जाणणारा, ज्ञानी, स्रग्वी : पवित्र तुळस.)” त्याने या सोबत हे देखील सांगितले आहे की, ही लेट पोस्ट आहे. संकर्षण हा २७ जूनलाच बाबा झाला आहे. परंतु त्याने ही गोड बातमी महिन्याभरानंतर दिली आहे. तसेच त्याने या पोस्टमधून त्याला बाबा झाल्याचा किती आनंद झाला आहे, हे देखील सांगितले आहे. तसेच त्याने त्याच्या दोन मुलांना त्याचे दोन नवीन मित्र असे देखील संबोधले आहे. त्याने काही वर्षांपूर्वी शलाका पांडेसोबत लग्न केले आहे. (marathi actor sankarshan karhade become father give information on social media)

त्याची ही पोस्ट खूप वेगाने व्हायरल झाली आहे. त्याचे अनेक चाहते या पोस्टवर कमेंट करून, त्याचे अभिनंदन करत आहेत. तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार देखील त्याच्या या पोस्टवर कंमेंट करून त्याला शुभेच्छा देत आहेत. त्याच्या या पोस्टवर आदिनाथ कोठारे, ईशा केसकर, ऋता दुर्गुळे, स्पृहा जोशी आणि प्रसाद ओक यांसारख्या कलाकारांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

संकर्षण कऱ्हाडे याने अनेक चित्रपटात तसेच मालिकांमध्ये देखील काम केले आहे. त्याने ‘खोपा’, ‘नागपूर अधिवेशन’ आणि ‘वेडिंगचा शिनेमा’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच त्याने ‘देवा शप्पथ’, ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकांमध्ये काम केले आहे. त्याने ‘आम्ही सारे खवय्ये’ हा शोही होस्ट केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रियांका चोप्रा ते स्वरा भास्करपर्यंत, बॉलिवूड इंडस्ट्रीतील ‘ही’ रहस्ये वाचून उंचावतील तुमच्या भुवया!

-प्रार्थना बेहेरेच्या ‘आपली यारी’ गाण्याला रसिकांचा तुफान प्रतिसाद; दोन दिवसातच ओलांडला २ मिलियन व्ह्यूजचा टप्पा

-फ्रेंडशिप डे स्पेशल: बॉलिवूडमधील या कलाकारांची मैत्री पाहून तुम्हालाही वाटेल हेवा, करण-काजोलही आहेत यादीत सामील

हे देखील वाचा