Friday, April 11, 2025
Home मराठी चाहत्यांनी पाठवलेली पत्र पाहून संकर्षण कऱ्हाडे झाला भावूक; म्हणाला “या सगळ्यांन…”

चाहत्यांनी पाठवलेली पत्र पाहून संकर्षण कऱ्हाडे झाला भावूक; म्हणाला “या सगळ्यांन…”

जसं प्रेक्षक आपल्या लाडक्या कलाकाराला प्रेम देतात तसेच कलाकार देखील वेळात वेळ काढून आपल्या प्रेक्षकांच आभार मानतात असतात. मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने ही त्याच्या प्रेक्षकांच आभार मानले आहेत. संकर्षण कऱ्हाडे सध्या विविध नाटकांमध्ये झळकत आहे. ‘नियम व अटी लागू’, ‘तू म्हणशील तसं’ आणि ‘संकर्षण Via स्पृहा’ या तीन नाटकात दिसत आहे. सध्या तो खूप आपल्या कामामध्ये व्यस्त आहे. तरीही संकर्षणने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी एक पोस्ट शेअर केली आहे.
संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच संकर्षणने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत काही पत्र पाहायला मिळत आहेत. संकर्षणला ही सर्व पत्र त्याच्या चाहत्यांनी पाठवली आहेत. तसेच याला सुंदर कॅप्शन देत त्याने एक खास पोस्टही शेअर केली आहे.
त्याने लिहिले की, “प्रेक्षकांचा प्रत्येक शब्दं मोलाचा ….” गेल्या काही महिन्यांत प्रेक्षकांनी प्रयोगाला येउन मला अशी इनेक पत्रं दिली.. काही पत्रांमध्ये प्रचंड प्रेम होतं , कौतुक होतं , काहींमध्ये सुचना, भेटवस्तू , आणि काहींमध्ये काळजी .. प्रेक्षकांचा हा प्रत्येक शब्दं माझ्यासाठी मोलाचा आहे म्हणुन मी ही सगळी पत्रं आज लॅमिनेट करुन आणलीयेत आणि त्याची फाईल तयार केली आणि आता ह्या सगळ्या पत्रांना मी माझ्या स्वतःच्या अक्षरांत पत्रं लिहूनच उत्तर देणार.. (माझं अक्षर नाहीच कळणार तरीही.. करा आता सहन) पण , मोलाची गोष्टं ही कि सेल्फीच्या जमान्यात हा पत्रं प्रपंच माझ्यात आणि प्रेक्षकांमध्ये होणार भेटूच …”
संकर्षण कऱ्हाडे हा एक उत्तम कलाकार तर आहेच त्याशिवाय त्याच्य लिखाणाचे, दिग्दर्शनाचे, कवितांचे आणि त्याच्या सूत्रसंचालनाचे लाखो चाहते आहेत. (marathi actor sankarshan karhade special instagram post for fan letters and emotional)

हे देखील वाचा