Saturday, September 30, 2023

“आयुष्यात शब्द आणि…” संकर्षण कऱ्हाडेसाठी मराठीमधील ‘या’ दिग्गज अभिनेत्याने लिहिला होता खास संदेश

मराठी मनोरंजनविश्वातील अतिशय प्रभावी आणि हरहुन्नरी अभिनेता म्हणून संकर्षण कऱ्हाडेला ओळखले जाते. परभणी सारख्या छोट्या शहरातून येत त्याने त्याची मोठी ओळख तयार केली. अभिनय, लेखन, कवी, दिग्दर्शन, सूत्रसंचालन आदी क्षेत्रांमध्ये संकर्षणने त्याचे छाप सोडली आहे. त्याने अनेक मालिका, चित्रपट, नाटकांमध्ये काम केले आहे. संकर्षणला आज त्याच्या या प्रतिभेमुळे त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने बरीच स्तुती सुमने उधळली गेली आहे. त्याला यासाठी अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. मात्र तरीही त्याला या सर्वांमध्ये त्याच्या आयुष्यातील अतिशय खास अशा व्यक्तीने दिलेली कौतुकाची थाप खुच जवळची आणि मौल्यवान आहे.

संकर्षण कऱ्हाडेने नुकतेच एका मुलाखतीदरम्यान याबद्दल एक खुलासा केला आहे. तो म्हणाला की, “मी मागील ५/६ वर्षांपासून मी दररोज वापरत असलेल्या माझ्या डायरीच्या पहिल्या पानावर दोन लोकांची सही घेतो. एक तर माझे बाबा आणि दुसरे म्हणजे विक्रमवीर प्रशांत दामले. प्रशांत दामले या सहीसोबतच मला एक खास शेरा देखील लिहून देतात. त्यांनी मला मी त्यांच्या सही घेतली त्या पहिल्या वर्षी त्यांनी “कष्ट कर” असा शेरा दिला. दुसऱ्या वर्षी आणखी काही दिले. तिसऱ्या वर्षी त्यांनी “आयुष्यात शब्द आणि सूर फार महत्त्वाचे असतात” असे लिहिले. तर मागच्या वर्षी “मालिका, नाटक छान झाली” ते लिहिले, यावर्षी त्यांनी लिहिले की, “जे आहे ते राख, नाही ते मिळव.” प्रशांत दामले यांचे मोजक्या शब्दात मोठे काहीतरी सांगणे हे मला खूपच आवडते. मला या कौतुकासोबत त्यांनी अधिक मोठ्या जबाबदारीची जाणीव करुन दिली आहे.”

दरम्यान प्रशांत दामले यांच्या अशा कौतूकासोबत संकर्षणला त्याच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांच्या कौतुकाचाही विविध पद्धतीने आलेला अनुभव त्याने व्यक्त केला. त्याच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर तो सध्या ‘तू म्हणशील तसं’ या नाटकात काम करत असून, किचन क्वीन या शोचे सूत्रसंचालन करत आहे.

हे देखील वाचा