Sunday, June 23, 2024

लवकरच येतोय… ‘भिंतीपलिकडचं जग’, जाणून घ्या मराठमोळ्या चित्रपटाबद्दल सर्वकाही

आजही भारतात खुप गरीब लोक राहतात. त्यांना खायला निट अन्न नसते, तर राहीला घर देखील नसते. अशी लोक आपण पाहतो झोपडपट्टीमध्ये राहत असतात. पण अनेकदा या लोकांकडे कोणीही लक्ष देत नाहीत. झोपडपट्टी म्हटलं की, आपल्याला आठवतात फक्त एकापाठोपाठ असलेली पत्र्याची घरं. पण या पत्र्याच्या घरांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या समस्यांबद्दल कोणीच बोलत नाही. या लोकांना पत्र्याच्या घरांमध्ये राहण्याची वेळ का आली याबद्दलही कोणालाच माहिती नसते. रस्त्यात झोपडपट्टी दिसली तरी आपण नाक मुरडतो.

झोपडपट्टीतल्या लोकांमध्ये आणि आपल्यामध्ये एक भिंत आहे, जी पार करून त्यांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न कोणीच केला नाही. पण हिच भिंत पार करून त्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आणि झोपडपट्टीच्या लोकांचे जीवन सगळ्यांसमोर मांडण्यासाठी विजय उमाप या विद्यार्थ्याने केले आहे. त्याच्या ‘भिंतीपलिकडचं जग’  (Bhintipalikadch Jag) हा मराठीतील माहितीपट बनवला आहे. लवकरच हा माहितीपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

विजयने नुकतेच मिडीया ऍन्ड कम्युनिकेशन स्टडिजमध्ये आपले पदव्युत्तर शिक्षण पुणे विद्यापिठातील माध्यम आणि संज्ञापन विभागातून पुर्ण केले आहे. या विभागात शिक्षण घेत असताना विजय वेळात वेळ काढून एका झोपडपट्टीमध्ये लहान मुलांना शिकवायला जात असे. या झोपडपट्टीमधील मुलांना शिकवत असताना त्याला तेथील समस्या निदर्शनास आल्या. तेथे राहणाऱ्या मुलांच्या पालकांसोबत त्याने वारंवार चर्चा केली आणि तेव्हा त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.

त्यानंतर विजयला या झोपडपट्टील्या एका जगाबद्दल माहितीपट बनवण्याची कल्पना सुचली. सुरूवातीला तेथील लोकांनी त्याला सहकार्य केले नाही. पण विजयने व स्नेहल भोसले यांनी त्यांना समजावून सांगितले त्यांना विश्वासात घेतले. यासाठी त्याने सोबत शिक्षण घेणाऱ्या त्याच्या वर्गमित्रांची आणि स्नेहल भोसले या मैत्रिणीची मदत घेतली.

माहितीपट बनवताना विजयला खुप अडचणी आल्या पण अखेर सगळ्या अडचणींचा सामना करत त्याने चित्रीकरण पुर्ण केले. पण मित्रांची साथ आणि विभागातील शिक्षकांचे मार्गदर्शन त्याला भेटले नसते, तर त्याला हा माहितीपट पुर्ण करणे शक्य झाले नसते, असे विजय नेहमी सांगतो. (Vijay Umap’s film VarapalikadCha Jag will soon hit the audience)

अधिक वाचा-
57 वर्षीय शाहरुख खानच्या फिटनेसची आनंद महिंद्रांना पडली भुरळ, म्हणाले, ‘आयुष्य खूप….’
अभिनेते किरण माने ‘सिंधुताई माझी माई’ मालिकेत दिसणार ‘या’ भूमिकेत; अभिनेत्याने पोस्ट करून दिली माहिती

हे देखील वाचा