चित्रपटसृष्टीत कधी काय ट्रेंडिंग होईल याचा काही नेम नाही. कधी कलाकारांचे ड्रेस, तर कधी त्यांचे बूट ट्रेंड होऊ लागतात. परंतु मराठी कलाविश्वात जरा वेगळंच ट्रेंड होताना दिसतंय. आता अनेकांना असा प्रश्न पडला असेल की, नेमकं काय ट्रेंड होतंय?, तर ट्रेंड होतंय ते म्हणजे मराठमोळी अभिनेत्री मिताली मयेकरचं ‘मंगळसूत्र’. मराठमोळी जोडी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच २४ जानेवारी, २०२१ रोजी लगीनगाठ बांधत संसार थाटला. पुण्यातील ढेपे वाढा येथे त्यांचे लग्न थाटामाटात पार पडले. त्यांच्या या लग्नाला अनेक मित्रमंडळींनी हजेरी लावली. यादरम्यानचे अनेक फोटो व्हायरल झाले होते. परंतु आता मितालीच्या मंगळसूत्राचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मितालीने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर आपल्या मंगळसूत्राचा फोटो ठेवला होता. या व्हायरल होत असलेल्या फोटोत तिच्या छोट्या मंगळसूत्रामध्ये काळे मणी आणि हिऱ्याचा पेंडेंट दिसत आहे. यापूर्वीही अशा डिझाइनचे मंगळसूत्र अनेक अभिनेत्रींच्या गळ्यात पाहायला मिळाले आहेत.
परंतु आता मितालीच्या रूपात या ट्रेंडने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे सर्वत्र याचीच चर्चा होताना दिसत आहे. विशेष म्हणजे मराठीच नाही, तर बॉलिवूड अभिनेत्री काजल अगरवालनेही गळ्यात अशाच डिझाइनचं मंगळसूत्र घातलं होतं.
सोशल मीडियावरील कलाकारांचा वावर वाढल्यामुळे एखादा ट्रेंड सुरू होण्यास वेळ लागत नाही. यापूर्वी अभिनेत्री अभिज्ञा भावे हिच्या मंगळसूत्राचीही सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती.
मिताली आणि सिद्धार्थ हे लग्नाच्या २ वर्षांपूर्वीपासून एकमेकांना डेट करत होते. एकमेकांसोबत चांगला वेळ घालवल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
मितालीने सन २००९ मध्ये ‘बिल्लू’ या चित्रपटातून अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर तिने ‘उर्फी’, ‘यारी दोस्ती’ यांसारख्या चित्रपटात काम केले. याव्यतिरिक्त तिने ‘असंभव’, ‘उंच माझा झोका’ यांसारख्या कार्यक्रमांमध्ये काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-नादच खुळा! ‘तेरी मिट्टी’ गाण्याला आवाज देणाऱ्या बी प्राकचं नवीन गाणं रिलीझ, होतंय जोरदार व्हायरल
-बजरंगी भाईजाच्या मुन्नीने पुन्हा वेधले चाहत्यांचे लक्ष, डान्स व्हिडिओ होतोय व्हायरल!!