‘मला नेहमीच अभिमान वाटतो की…’, म्हणत लाडक्या सिद्धूनेही दिल्या अशोक मामांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

actor siddharth jadhav gave birthday wishesh to ashok saraf by sharing special post


मराठी चित्रपटसृष्टीत ‘मामा’ म्हणून ओळखले जाणारे अभिनेता म्हणजेच दिग्गज अभिनेते अशोक सराफ. मराठी व हिंदी अशा दोन्ही इंडस्ट्रीमध्ये काम करून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. आपल्या विनोदी पण दमदार अशा अभिनयाने, त्यांनी तब्बल तीन दशके प्रेक्षकांचे मनोरंजन केले. शुक्रवारी (४ जून) अशोक सराफ यांचा ७४ वा वाढदिवस आहे.

अशोक सराफ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, त्यांच्यावर सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. चाहत्यांपासून ते मोठमोठ्या कलाकारांपर्यंत सर्वजण त्यांना भरभरून शुभेच्छा देत आहेत. एवढेच नव्हे तर त्यांच्या पोस्ट देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आज ‘सिद्धू’ अर्थातच सर्वांचा लाडका सिद्धार्थ जाधव याने देखील अशोक यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

सिद्धार्थने त्याच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर अशोक सराफसोबतचा त्याचा एक फोटो शेअर केला आहे. याखाली कॅप्शन लिहीत सिद्धूने मामांना शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देत सिद्धार्थ म्हणतोय की, “अशोक सराफ… ‘महाराष्ट्राचा महानायक’… अशोकमामा वाढदिवसाच्या शुभेच्छा. लहानपणापासून तुमची चित्रपटातली कामं पहात मोठा झालो. तुमच्याबरोबर काम करायला मिळेल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण “साडे माडे तीन” या सिनेमाच्या निमित्ताने तेही स्वप्न पुर्ण झालं माझं. मला नेहमीच अभिमान वाटतो कि मी मराठी चित्रपटसृष्टीचा भाग आहे जिथे ‘अशोकमामांसारखा महानायक’ आहे. मामा… तुमच्याकडून आम्ही खुप काही शिकलो आणि अजूनही शिकतोय. आमच्यासारख्या कलाकारांवर तुमचे आशिर्वाद असेच कायम रहावेत, एवढीच विनम्र इच्छा.” सिद्धार्थने अशोक यांच्यासोबत ‘साडे माडे तीन’ या चित्रपटात एकत्र काम केलं आहे.

अशोक सराफ यांनी आजपर्यंत चित्रपटसृष्टीला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ‘गंमत जंमत’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘एक डाव भुताचा’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘बिन कामाचा नवरा’, ‘तुमचं आमचं जमलं’, ‘जवळ ये लाजू नको’, ‘दोन बायका फजिती ऐका’ अशा चित्रपटात अशोक यांनी दमदार भूमिका साकारल्या. त्यांना ‘पांडू हवालदार’ चित्रपटासाठी महाराष्ट्र सरकार चित्रपट पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तसेच ‘सवाई हवालदार’ चित्रपटासाठी त्यांना स्क्रीन अवॉर्डदेखील मिळाले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.