Wednesday, December 18, 2024
[aioseo_breadcrumbs]

नेहमीपेक्षा वेगळ्या लूकमध्ये दिसला ‘सिद्धू’, फोटो पाहून चाहता म्हणाला, ‘मराठी शाहरुख’

मराठी चित्रपटसृष्टीत एक असा अभिनेता आहे, ज्याला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण त्याला ओळखतात. तो अभिनेता इतर कुणी नसून आपल्या सर्वांचा लाडका ‘सिद्धू’ अर्थात सिद्धार्थ जाधव होय. सिद्धार्थने आपल्या अभिनयाच्या जादूने चाहत्यांच्या मनात मानाचे स्थान निर्माण केले आहे. आपल्या विनोदाने तर त्याने प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडले आहे. अभिनयाने चित्रपटसृष्टी गाजवणारा सिद्धू सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय असतो. तो नेहमीच आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट शेअर करत असतो. सध्या सिद्धार्थ सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. अशातच त्याने त्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सिद्धार्थने नुकतेच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्याचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, त्याने स्टायलिश ड्रेस परिधान केला आहे. तसेच चष्मा लावला आहे. फोटोमध्ये त्याच्या लूक नेहमीपेक्षा खूप वेगळा आणि मॉर्डन दिसत आहे. या ड्रेसमध्ये तो वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. (Marathi actor siddharth jadhav share his stylish photos on social media)

त्याच्या या लूकवर त्याचे अनेक चाहते कमेंट करत आहेत. त्याच्या एका चाहत्याने या फोटोवर “मराठी शाहरुख,” अशी कमेंट केली आहे. आणखी एका चाहत्याने “लय भारी दिसत आहात तुम्ही,” अशी कमेंट केली आहे. तसेच बाकी अनेक चाहते या फोटोवर प्रतिक्रिया देत आहेत.

सिद्धार्थच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने २००४ साली ‘अगं बाई अरेच्छा’ या चित्रपटात पहिल्यांदा काम केले होते. यानंतर त्याने ‘जत्रा’, ‘जबरदस्त’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘दे धक्का’, ‘गलगले निघाले’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘कुटुंब’, ‘फास्टर फेणे’, ‘जत्रा’, ‘ये रे ये रे पैसा’, ‘हुप्पा हुय्या’, ‘टाईम प्लीज’, ‘धुरळा’ यांसारख्या अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे.

त्याच्या उत्कृष्ट अभिनयामुळे त्याला बॉलिवूडमधूनही ऑफर आल्या. त्याने ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘सिटी ऑफ गोल्ड’, ‘राधे’ आणि ‘सिंबा’ या हिंदी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘सिंबा’ चित्रपटात त्याने रणवीर सिंगसोबत पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सौंदर्य ही शक्ती, तर स्माईल त्याची तलवार!’ वैदेही परशुरामीचे रूप पाहुन हरपले चाहत्यांचे भान

-पुण्यातून इंजीनियरिंगचे शिक्षण घेणारा वैभव तत्ववादी ‘असा’ बनला प्रसिद्ध अभिनेता; रंजक आहे त्याचा प्रवास

-सोनम कपूरच्या आयुष्यात ‘Someone special’ची एन्ट्री; पोस्ट शेअर करत म्हणाली, ‘तयार व्हा’

हे देखील वाचा