‘आठवणी अनमोल असतात…’, सेटवरचा फोटो शेअर करत जुन्या आठवणीत रमला सिद्धू


सर्वांच्याच आयुष्यात आठवणींना खूप महत्त्व आहे. चांगल्या वाईट सर्वच आठवणी आपल्या मनात घर करून असतात. या आठवणींमुळेच आपण जुने दिवस आणि जुन्या घटना आपल्यासोबत बांधून ठेवू शकतो. विशेष म्हणजे, कलाकारही याला अपवाद नाहीत. मनोरंजन सृष्टीमध्ये कलाकार आठवणी बनवत जातात. चित्रपटाच्या सेटवर मजा- मस्ती करताना कलाकारांमध्येही मैत्री होते आणि तेव्हा होणारी मस्ती, ही नंतर आठवणींच्या रूपाने त्यांच्या मनात राहते. (marathi actor siddharth jadhav shared old memories from set see photo)

मराठमोळा सिद्धार्थ जाधवही जुन्या आठवणीत रमलेला पाहायला मिळाला. नुकतीच त्याने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत, जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्याने चित्रपटाच्या सेटवरचा एक थ्रोबॅक फोटो याठिकाणी शेअर केला आहे. या फोटोमध्ये सिद्धार्थ जाधवसोबत सई ताम्हणकर, मुक्ता बर्वे, मनवा नाईक आणि आदिती भागवत या अभिनेत्री आहेत. हा फोटो गोव्याचा असल्याचे दिसत आहे. यात तुम्ही पाहू शकता की, गोव्यामध्ये एका बीचवर ही मंडळी बसलेली आहे.

हा फोटो शेअर करत सिद्धू म्हणतोय की, “आठवणी या अनमोल असतात. पाहा सिक्सर…चला भेटूया…” असं म्हणत त्याने सर्वांना टॅगही केलं आहे. फोटोवर अगदी काही वेळातच तब्बल ३२ हजाराहून अधिक लाईक्स आले आहेत. तसेच चाहते देखील या फोटोवर प्रतिक्रिया देत आहेत. तसेच फोटोमधील सिद्धार्थचा लूक चाहत्यांना विशेष आवडल्याचे दिसून येत आहे.

सिद्धार्थच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तो अलीकडेच प्रभूदेवाच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या, ‘राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई’मध्ये महत्वाची भूमिका साकारताना दिसला. या चित्रपटात सलमान खान आणि दिशा पटानी मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले. सिध्दार्थने ‘अगं बाई अरेच्चा’, ‘जत्रा’, ‘ये रे ये रे पैसा’, ‘दे धक्का’, ‘हुप्पा हुइया’, ‘टाइम प्लीज’, ‘धुरळा’ इत्यादी चित्रपटात अभिनय करून, प्रेक्षकांची मने जिंकली. यानंतर त्याने बॉलिवूडमध्येही ‘गोलमाल’, ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘सिटी ऑफ गोल्ड’ आणि ‘सिम्बा’ या चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘केजीएफ चॅप्टर २’ ला मिळतोय भरभरून प्रतिसाद; तब्बल ‘इतके’ व्ह्यूज मिळवून यूट्यूबवर केलाय राडा!

-ब्लु नाईटीमध्ये दिसली रुचिरा जाधव; अभिनेत्रीच्या हॉट अंदाजाने नेटकरी झाले घायाळ

-उर्वशी रौतेलानंतर आता मुनमुन दत्तानेही केली ‘मड बाथ’; जॉर्डनमधील फोटो होतायेत व्हायरल


Leave A Reply

Your email address will not be published.