आपल्या सहजसुंदर अभिनयाने चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या सिद्धार्थ जाधवचे भन्नाट फोटोशूट, दिसला वेगवेगळ्या अंदाजात

Marathi Actor Siddharth Jadhavs Photoshoot Goes To Viral


चित्रपटसृष्टीत येऊन आपली एक वेगळी ओळख बनवणे वाटते तितके सोपे नसते. यामागे कलाकाराने प्रचंड मेहनत घेतलेली असते. अनेक लहान- मोठ्या भूमिका साकारत त्यांनी यशाचं पाणी चाखलेलं असतं. यातीलच एक अभिनेता म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका सिद्धू म्हणजेच सिद्धार्थ जाधव होय. सिद्धार्थ आज आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर आहे. त्याला कोणत्याही परिचयाची गरज नाही. त्याने मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीही आपल्या सहजसुंदर अभिनयाने गाजवली आहे. त्याचा चाहतावर्गही मोठा आहे. सिद्धार्थ सोशल मीडियावर आपले हटके फोटो, व्हिडिओ आणि आयुष्यातील अनुभव शेअर करून नेहमीच चाहत्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत असतो. त्याने केलेले फोटोशूट सध्या चर्चेत आहे. यामध्ये तो वेगळ्याच लूकमध्ये दिसत आहे.

सिद्धार्थने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून मागील वर्षीच्या अखेरीस हटके फोटो शेअर केले होते. यामध्ये त्याचा वेगवेगळा अंदाज पाहायला मिळत आहे.

सिद्धार्थने या सर्व फोटोंना ‘आपला सिद्धू’ असे कॅप्शन लिहिले आहे.

या फोटोंमध्ये सिद्धार्थच्या डोक्यावर खूप सारे केस दिसत आहेत. सोबतच त्याने फ्रेंच स्टाईलमधील दाढीही ठेवली आहे. यासह त्याने पिवळ्या रंगाचा गॉगलही घातला.

सिद्धार्थने पडदा छोटा असो किंवा मोठा सर्व ठिकाणी आपली वेगळीच छाप सोडली आहे. यात त्याने अने मोठ्या दिग्गज मंडळींसोबत काम केले आहे. यामध्ये अजय देवगण, रणवीर सिंग या अभिनेत्यांचा समावेश आहे.

सिद्धार्थच्या कारकिर्दीविषयी बोलायचं झालं, तर सन २००४ साली आलेल्या ‘अगं बाई अरेच्छा!’ हा त्याचा पहिलाच सिनेमा होता. यानंतर त्याने ‘जत्रा’, ‘गोलमाल: फन अनलिमिटेड’, ‘जबरदस्त’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘दे धक्का’, ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘गलगले निघाले’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘हुप्पा हुय्या’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘कुटुंब’, ‘फास्टर फेने’ यांसारख्या अनेक हिंदी- मराठी चित्रपटात काम केले आहे.

याव्यतिरिक्त तो शेवटचा ‘धुराळा’ या चित्रपटात झळकला होता. तसेच तो सलमान खानचा बहुप्रतिक्षित ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ या चित्रपटातही तो दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभू देवाने केले आहे. हा चित्रपट येत्या १३ मे रोजी रिलीझ होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ज्याचा मराठमोळा सिद्धू लहानपणापासून होता दिवाना; त्याच व्यक्तीबरोबर मिळाली काम करण्याची संधी

-‘पंचम दा’ यांच्या निधनाच्या ४ महिन्यांनंतर बँक लॉकरमध्ये सापडले ‘इतके’ रुपये, पाहून झाले होते सगळेच हैराण

-प्रसिद्ध गायक लकी अली यांचे निधन? जवळची मैत्रीण आणि अभिनेत्रीने दिले स्पष्टीकरण


Leave A Reply

Your email address will not be published.