‘पंचम दा’ यांच्या निधनाच्या ४ महिन्यांनंतर बँक लॉकरमध्ये सापडले ‘इतके’ रुपये, पाहून झाले होते सगळेच हैराण

Let's know property fact about famous musician R.D. Burman


हिंदी संगीत क्षेत्रामध्ये आर. डी. बर्मन यांच्या नावाची गणना दिग्गज संगीतकारांच्या यादीत होते. त्यांना ‘पंचम दा’ या नावाने सर्वत्र ओळखतात. त्यांची गाणी आजही अनेकांच्या ओठावर येत असतात. संगीत क्षेत्रात एवढे यश मिळालेल्या या संगीताकाराने 4 जानेवारी, 1994 मध्ये या जगाचा निरोप घेतला होता. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या प्रॉपर्टीवरून खूप वाद निर्माण झाले होते. हा वाद झाला होता, आर. डी. बर्मन यांची पत्नी आशा भोसले आणि त्यांचा सेक्रेटरी भरत यांच्यात. त्या दोघांनी एकमेकांवर आरोप लावायला सुरुवात केली होती. हा वाद पुढे जाऊन एवढा वाढला की, ही गोष्ट अगदी पोलिसांना समजली.

आर. डी. बर्मन यांच्या संपत्ती सोबतच त्यांच्या बँकमधील एका लॉकरवर देखील सर्वांची नजर होती. जो मुंबई मधील सांताक्रुझ भागातील सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये होता. आशा भोसले आणि भरत या दोघांच्या मते त्या लॉकरमध्ये एक तरी खूप पैसे असतील नाहीतर खूप दागिने असतील. त्यामुळे या दोघांकडूनही लॉकर उघडण्याबाबत अनेक विनवण्या केल्या जाऊ लागल्या होत्या. त्या नंतर या बँकेच्या अधिकाऱ्यांनी 3 मे, 1994 मध्ये आशा भोसले आणि भरत त्यांच्या काही नातेवाईकांना बोलवून त्यांच्या समोर हा लॉकर उघडला होता.

आर. डी. बर्मन यांच्या मृत्यूनंतर 4 महिन्यांनी सगळ्या नातेवाईकांच्या‌ समोर जेव्हा बँकेच्या अधिकाऱ्यांनी हा लॉकर उघडला, तेव्हा सगळे हैराण झाले. कारण या लॉकरमध्ये आर. डी. बर्मन यांनी केवळ पाच रुपये ठेवले होते. त्यामुळे सगळेजण नाराज झाले होते.

ज्या लॉकरसाठी एवढी भांडणं झाली त्या लॉकरमध्ये केवळ पाच रुपये मिळाल्याने काहीजन हैराण झाले होते, तर काहीजण आशा भोसले आणि भरत यांच्यावर हसत होते. पण आर. डी. बर्मन यांनी त्या लॉकरमध्ये केवळ पाच रुपये का ठेवले होते??हे मात्र कधीही न उलगडलेले एक कोडे आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-घरबसल्या मनोरंजनाचा ‘डबलडोस!’ १० असे चित्रपट, जे तुमचा दिवस बनवतील खास; एकदा यादी पाहाच

-ऐकलंंत का मंडळी! आधीपासून विवाहित असलेल्या व्यक्तींशी केले ‘या’ अभिनेत्रींनी लग्न, मधुबालाचाही समावेश

-बॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रींनी विवाहित पुरुषांशी केले प्रेम, शेवटी राहिल्या अविवाहित; एकीने तर घेतलाय जगाचा निरोप


Leave A Reply

Your email address will not be published.