Monday, September 25, 2023

‘मी काय तुम्हाला हट्ट केला नाही…’, राहुल गांधींचा बायोपिक बघण्याविषयी सुबोध भावेचे लक्षवेधी विधान

‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘बालगंधर्व’, ‘हर हर महादेव’ यांसारखे जबरदस्त सिनेमे देणारा मराठी अभिनेता म्हणजे सुबोध भावे होय. त्याने आजपर्यंत अशा एकापेक्षा एक सिनेमात काम करून प्रेक्षकांच्या मनात मानाचं स्थान निर्माण केले आहे. सुबोध त्याच्या सिनेमांव्यतिरिक्त त्याच्या परखड मतांसाठीही चर्चेचा धनी ठरत असतो. अशात त्याने पुन्हा एकदा आपल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने काँग्रेसचे नेते राहुल गांधी बायोपिक करण्याविषयी मत मांडले आहे.

सुबोधने लावली ‘खुपते तिथे गुप्ते’मध्ये हजेरी
टीव्हीवरील ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupate Tithe Gupte) प्रसिद्ध शोमध्ये कलाकारांपासून ते नेते मंडळींपर्यंत सर्वजण हजेरी लावताना दिसतात. अशात सुबोध भावे (Subodh Bhave) यानेही शोच्या तिसऱ्या हंगामात नुकतीच हजेरी लावली होती. यादरम्यान सुबोध अवधूत गुप्ते (Avadhoot Gupte) याच्या प्रश्नांची उत्तरे देताना दिसणार आहे. शोदरम्यानचे काही व्हिडिओही समोर येत आहेत. अशात सुबोध भावे राहुल गांधी (Subodh Bhave Rahul Gandhi) यांची भूमिका साकारण्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

काय म्हणाला सुबोध?
या शोमध्ये होस्ट अवधूत गुप्तेने सुबोधला प्रश्न विचारत म्हटले की, “तू मुलाखतीत म्हणाला तसं तुला खरंच राहुल गांधी यांची भूमिका असलेला सिनेमा करायची इच्छा आहे का?” या प्रश्नाचे उत्तर देत सुबोध म्हणाला की, “कायप्रकारे त्यांची मुलाखत घेऊ शकतो, असा मी विचार करत होतो आणि माझ्या डोक्यात कल्पना आली की, अरे आपण इतके बायोपिक केलेत, तर समजा या कल्पनेने आपण मुलाखतीची सुरुवात केली की, माझ्याकडे तुमचा बायोपिक आलाय, आणि मी जेव्हा माझ्याकडे बायोपिक येतो, तेव्हा मी कुठल्याही व्यक्तिरेखेचा अभ्यास करतो. तसा मला तुमचा अभ्यास करायचा आहे की, राहुल गांधी म्हणजे काय आहात? एका व्यक्तिरेखेला तो कसा आहे हे विचारण्याचे प्रश्न येतात. त्या अनुषंगाने त्याची उत्तरेही येतात.”

‘मी कोणालाही सक्ती केली नाही’
यानंतर पुढे बोलताना सुबोध असेही म्हणाला की, “मी कुठल्या भूमिका करायच्यात, याचं स्वातंत्र्य मला आहे. तुम्ही तो बघायचा की नाही, याचं स्वातंत्र्य तुमचंय. मी काय तुम्हाला हट्ट केला नाही की, राहुल गांधींची भूमिका केली तर तुम्हाला बघायला यायलाच पाहिजे.”

सुबोधचे सिनेमे आणि मालिका
सुबोध भावे याने फक्त सिनेमातच काम केले नाही, तर अनेक शानदार मालिकांमध्ये काम करून घराघरात पोहोचला. सुबोधच्या मालिकांमध्ये ‘तुला पाहते रे’, ‘चंद्र आहे साक्षीला’, ‘बस बाई बस’, ‘का रे दुरावा’, ‘जय जय महाराष्ट्र’, ‘आभाळमाया’ यांचा समावेश आहे. तसेच, त्याने ‘लोकमान्य: एक युगपुरुष’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘फुलराणी’, ‘वाळवी’ आणि ‘फुगे’ यांसारख्या अनेक शानदार सिनेमांमध्येही काम केले आहे. (marathi actor subodh bhave talk about playing congress leader rahul gandhi role know here)

महत्त्वाच्या बातम्या-
अनुपम खेर यांनी केला ‘गदर 2’चा प्रामाणिक रिव्ह्यू; स्पष्टच म्हणाले, ‘सनी देओल अभिनेताच नाही…’
जेव्हा वजन वाढल्यामुळे सलमानने ‘या’ अभिनेत्याला म्हटलेले, ‘मी तुला काम नाही देणार’, त्यानेच केला खुलासा

हे देखील वाचा