Tuesday, September 26, 2023

अनुपम खेर यांनी केला ‘गदर 2’चा प्रामाणिक रिव्ह्यू; स्पष्टच म्हणाले, ‘सनी देओल अभिनेताच नाही…’

बॉलिवूडचा पॉवरहाऊस अभिनेता सनी देओल याचा ‘गदर 2‘ बॉक्स ऑफिसवर सगळी कसर भरून काढत आहे. सिनेमा रिलीज होऊन आता 7 दिवस उलटले आहेत. तसेच, हा सिनेमा 250 कोटींच्या क्लबमध्येही सामील झाला आहे. चाहत्यांसोबतच कलाकारांनीही सनी देओलच्या ‘गदर 2’वर प्रेमाचा वर्षाव केला आहे. या कलाकारांच्या यादीत आता अनुपम खेर यांच्या नावाचाही समावेश झाला आहे. अनुपम खेर यांनी सिंगल स्क्रीनवर सनीचा सिनेमा पाहिला. यानंतर अनुपम खेर यांनी सनी देओलचे कौतुक केले. त्यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर केली, जी आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

‘गदर 2’ (Gadar 2) सिनेमात सनी देओल (Sunny Deol) याच्यासोबत अमीषा पटेल (Ameesha Patel) मुख्य भूमिकेत आहे. तारा सिंग आणि सकीना या पात्रांचा रोमान्स पाहून चाहते पुन्हा एकदा इम्प्रेस झाले आहेत. ‘गदर 2’ सिनेमाला सिंगल स्क्रीनमधूनही चांगलाच फायदा झाला आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा अनेक विक्रम मोडत आहे.

अनुपम खेर यांची पोस्ट
अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी दीर्घकाळापासून सिंगल स्क्रीनवर कोणताही सिनेमा पाहिला नाही. त्यांनी ट्वीट केले की, “मी अखेरचा सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये माझा सिनेमा हमच्या प्रीमिअरला गेलो होतो. गदर 2 भावनांची त्सुनामी आहे, जी फक्त स्क्रीनवरच नाही, तर प्रेक्षकांनाही थिएटरमध्ये जाणवते. तुम्हाला एका रोलर कोस्टर राईडवर घेऊन जाते की, एक गौरवान्वित भारतीय असण्याचा अर्थ काय आहे. हा सिनेमा वास्तवात आपण आपल्या देशाच्या बहुसंस्कृती पैलूचा जल्लोष करतो. लोक प्रत्येक डायलॉग ऐकून ओरडतात.”

सनीचे कौतुक
सनी देओल याचे कौतुक करत त्यांनी लिहिले की, “सनी आता अभिनेता राहिला नाहीये, तो एक कल्ट बनला आहे. तो फायर आहे आणि त्याची हीट तुम्हाला तुमच्या आत्म्यापर्यंत जाणवते. उत्कर्ष खूपच शानदार आहे. मनीष वाधवाने पाकिस्तानचा जनरल म्हणून चांगले काम केले आहे. अनिल शर्मा मला चित्रपटगृहात या जॉयराईडसाठी धन्यवाद. जय हो.”

‘गदर 2’ची कमाई
सनी देओल याच्या ‘गदर 2’ (Sunny Deol Gadar 2) सिनेमाच्या कमाईविषयी बोलायचं झालं, तर आतापर्यंत सिनेमाने 284 कोटींची कमाई केली आहे. हा सिनेमा लवकरच 300 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्याच्या मार्गावर आहे. (actor anupam kher review sunny deol gadar 2 says he is not an actor anymore know here)

महत्त्वाच्या बातम्या-
जेव्हा वजन वाढल्यामुळे सलमानने ‘या’ अभिनेत्याला म्हटलेले, ‘मी तुला काम नाही देणार’, त्यानेच केला खुलासा
‘Gadar 2’च्या कमाईत घसरण! 7व्या दिवसाचे कलेक्शन खूपच कमी, 300 कोटींच्या क्लबमध्ये करणार का एन्ट्री?

हे देखील वाचा