Thursday, December 4, 2025
Home मराठी भावपूर्ण श्रद्धांजली ! मराठी अभिनेते विलास उजवणे यांचे 61 व्या वर्षी निधन

भावपूर्ण श्रद्धांजली ! मराठी अभिनेते विलास उजवणे यांचे 61 व्या वर्षी निधन

मराठी मनोरंजन सृष्टीतून अत्यंत दुःखद बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे मराठी सहित हिंदी मालिका विश्व गाजवलेले अभिनेते डॉक्टर विलास उजवणे (Vilas Ujavane) यांचे निधन झालेले आहे. वयाच्या 61 व्या वर्षी त्यांची प्राणजोत मालवली आहे. गेल्या अनेक वर्षापासून त्यांना ब्रेन स्ट्रोकचा आजार झाला होता. त्यानंतर त्यांनी यावर उपचार देखील घेतले होते. परंतु त्यांना हृदयासंबंधी आजार चालू झाला. यावर त्यांनी उपचार चालू ठेवले आणि त्यांची तब्येत पुन्हा खराब झाली. आणि अखेर आज म्हणजेच आज 5 एप्रिल 2025 रोजी त्यांचे निधन झालेले आहे. त्यांच्यामागे यांची पत्नी आणि एक मुलगा आहे.

विलास उजवणे यांना 2022 साली ब्रेन स्ट्रोक झाला होता. यावेळी त्यांना ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले होते. आणि त्यांच्यावर उपचार देखील चालू होते. त्यावेळी त्यांना हा आर्थिक खर्च परवडत नव्हता. यावेळी त्यांच्या मित्रांनी फेसबुक पोस्ट करून इंडस्ट्रीतील कलाकारांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले होते. या आजारातून ते बरे झाले आणि त्यांनी कमबॅक केले. त्यांनी कुलस्वामिनी या मराठी सिनेमात काम केलं. येत्या काही दिवसात त्यांचा हा चित्रपट रिलीज देखील होणार आहे.

विलास उजवणे यांचा जन्म नागपूर मध्ये झाला आहे. त्यांनी नागपूर विद्यापीठातूनच वैद्यकीय शिक्षण घेतले. परंतु त्यांना अभिनयाची आवड होती. त्यामुळे त्यांनी मुंबईत येऊन अभिनय क्षेत्रात काम करण्याचे ठरवले. त्यांनी अनेक नाटकांमध्ये देखील काम केले. त्यांनी चार दिवस सासूचे, वादळवाट, दामिनी यांसारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे. त्यांनी एकूण 110 सिनेमांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

धर्मेद्र यांची नक्कल केल्यावर आली अडचण मात्र जावेद अख्तारांच्या वेळी हे झाले; मिमिक्री कलाकार केतन सिंगने सांगितला किस्सा…
या एका कारणामुळे मनोज कुमार होते शाहरुख खानवर नाराज; शेवट पर्यंत केले नाही माफ…

हे देखील वाचा