Wednesday, December 6, 2023

मराठी अभिनेत्याची गंभीर आजाराशी झुंज, आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने मदतीसाठी शेअर केली पोस्ट

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता डॉ. विलास उजवणे यांनी अनेक चित्रपटामध्ये आणि मराठी वाहिणीवरील ‘चार दिवस सासूचे’ सारख्या अनेक गाजणाऱ्या मालिकांमध्ये काम केले आहे. आपल्या दमदार अभिनयाने मराठी इंडस्ट्रीमध्ये छाप सोडणारे प्रसिद्ध अभिनेता सध्या कठीण परिस्थितीचा सामना करत आहे. गेल्या काही दिवासांपासून त्यांना ‘ब्रेन स्ट्रोक’ नावाचा आजारा झाला होता. त्या आजाराला बरं करण्यासठी अभिनेत्याची पूर्ण जमापुंजी खर्च झाली. त्यामुळे आता त्यांच्यावर आर्थिक आजारासोबतच आर्थिक संकट कोसळलंय.

प्रसिद्ध अभिनेता विलास उजवणे (Vilas  Ujavane) हे गेल्या सहा वर्षापासून ‘ब्रेन स्ट्रोक’ सारख्या घातक आजाराशी झुंज देत असून त्यांना हृदयविकाराचा त्रासही जनवत आहे. त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्यासोबतच त्यांना कावीळीचीही लागण झाली आहे. यासगळ्या आजारांवर अभिनेत्याची आयुष्यभराची जमापुंजी खर्च केली आहे. आता पुढील उपचारांसाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नाहीत. त्यामुळे त्यांनी पुढील उपचारासाठी मदतीचे आवाहन केले आहे. याबद्दल त्यांच्या मित्र राजू कुलकर्णी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेता विलास उजवणे यांनी मराठी चित्रपटांसोबतच हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली आहे. ‘चार दिवस सासूचे’, वादळवाट सारख्या गाजणाऱ्या मालिकांमध्येही त्यांनी धामेकदार कामगिरी बजावली आहे. त्यांनी आतापर्यंत नाट्यक्षेत्र आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्येही काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
सई ताम्हणकरच्या नव्या फोटोंची चाहत्यांना भुरळ
घटस्फाेटाच्या चर्चेवरून उर्मिला कोठारेचं माेठं वक्तव्य; म्हणाली, ‘ब्रेकअप झालं…’

हे देखील वाचा