Tuesday, July 9, 2024

मराठीतील प्रसिद्ध कलाकार जोडपे कोरोनाच्या विळख्यात! उमेश कामत आणि प्रिया बापट कोरोना पॉझिटिव्ह; सोशलवर दिली माहिती

भारतात कोरोना व्हायरसचा उद्रेक पुन्हा एकदा झालेला पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. विशेषत: महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. या व्हायरसच्या जाळ्यात आता सेलिब्रिटीही अडकले जात आहेत. अशातच मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार जोडपे उमेश कामत आणि प्रिया बापट कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. याची माहितीदेखील या जोडप्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिली आहे.

उमेश आणि प्रियाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, ‘दुर्दैवाने आम्ही कोरोना पॉझिटिव्ह आढळलो आहोत. आम्ही दोघेही आमच्या घरी सेफ्ट क्वारंटाईन झालो आहोत. आम्ही दिलेली औषधे घेत आहोत आणि त्यांनी सांगितलेल्या सुचनांचे पालनही करत आहोत. मागील आठवड्यात जे कोणी आमच्या संपर्कात आले होते, त्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी.’

या जोडप्याने नुकतीच आपल्या ‘आणि काय हवे’ या वेबसीरिजच्या तिसऱ्या सीझनच्या शूटिंगला सुरुवात केल्याची माहिती आपल्या सोशल मीडियावरून दिली होती.

उमेश कामत आणि प्रिया बापट यांनी सन २०११ मध्येच लगीनगाठ बांधली होती. ते सन २०१३ साली ‘टाईम प्लीज’ या चित्रपटात एकत्र झळकले होते. उमेश मागील काही महिन्यांपासूून ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकाचे प्रयोगही करत होता.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडमधील अनेक कलाकार कोरोना व्हायरसच्या जाळ्यात अडकले. यामध्ये अभिनेता रणबीर कपूर, निर्माते संजय लीला भन्साळी, मनोज वाजपेयी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

देशात मागील २४ तासांमध्ये कोरोनाची एकूण २८,९०३ नवीन प्रकरणे समोर आली आहेत. यातील तब्बल १७,८६४ प्रकरणे एकट्या महाराष्ट्रातील आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-महाराष्ट्रात कोरोनाची लाट! चित्रपटगृहांसह गर्दीच्या ठिकाणांसाठी नियमावली केली जाहीर

-‘या’ कारणामुळे गौहर खानवर घातला दोन महिन्यांसाठी बहिष्कार; तर निर्मात्यांनाही मिळालाय कडक इशारा

-वडील-मुलाच्या नात्याची कथा मांडणारा ‘अवांछित’चा ट्रेलर रिलीझ; ‘या’ तारखेपासून फक्त झीप्लेक्सवर

हे देखील वाचा