‘या’ कारणामुळे गौहर खानवर घातला दोन महिन्यांसाठी बहिष्कार; तर निर्मात्यांनाही मिळालाय कडक इशारा

fwice decided to ban gauahar khan for two months for flouting covid 19 rules


चित्रपट कामगारांची सर्वात मोठी संस्था असलेल्या फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने (एफडब्ल्यूईसीआय) मंगळवारी (16 मार्च) अभिनेत्री गौहर खानवर दोन महिन्यांसाठी बहिष्कार घातला आहे. याचे कारण असे की, तिला कोरोनाचा संसर्ग झाला असूनही तिने शूटिंगमध्ये भाग घेतला. तिच्या या बेजबाबदारपणामुळे संपूर्ण युनिट धोक्यात आले. याप्रकरणी गौहरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणात काही लोकांनी गौहर खानला क्लीन चिट देण्याचाही प्रयत्न केला.

दिनांक 15 मार्च रोजी, मुंबई शहर मेट्रोपॉलिटन नगरपालिका, ज्याला बृहन्मुंबई महानगरपालिका किंवा बीएमसी म्हणून ओळखले जाते, यांनी अभिनेत्री गौहर खानविरूद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. कोरोना संसर्ग झाल्याची बातमी कळल्यानंतरही, तिने घरी राहून अनिवार्य क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला नाही.

महाराष्ट्रात वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रकरणांमुळे आणि विशेष करुन त्याचा चित्रपटांवर होणाऱ्या परिणामांमुळे, फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज खूप चिंतेत आहेत. सतत चालू असणाऱ्या या चित्रपट उद्योगात काम करून हजारो घरात चुली पेटतात. चित्रपटांचे टीव्ही मालिका आणि वेब सीरिजचे शूटिंग सुरू झाले आहेत. मात्र, तरीही संगीत कार्यक्रम अद्याप सुरू होऊ शकले नाहीत. त्यामुळे मुंबईतील बऱ्याच साजिदांना उपासमारी सहन करावी लागत आहे. अशा परिस्थितीत, गौहर खानला कोरोना संसर्ग होऊनही तिचे शूटिंगवर जाणे अतिशय गंभीर बाब आहे.

या संदर्भात, फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजची मंगळवारी (16 मार्च) बैठक झाली. ज्यामध्ये या संपूर्ण प्रकरणावर विचार केला गेला. तसेच, या संदर्भात बीएमसी आणि मुंबई पोलिसांनी प्रशंसनीय कामगिरी केल्याचे समजले. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने, गौहर खानला या प्रकरणात जबाबदार ठरवून तिच्यावर दोन महिन्यांसाठी बंदी घातली आहे. यानंतरही एखादा चित्रपट, किंवा मालिका निर्मात्यांबरोबर ती काम करू शकेल की नाही, याबाबतही निर्देश जारी केले जातील.

या संदर्भात एखादा निर्माता गौहर खानला मदत करत असल्याचे आढळल्यास, त्यांच्याविरूद्धही कारवाई केली जाईल, असा इशारा फेडरेशनने दिला आहे. गौहर खानच्या वतीने काही लोकांनी मंगळवारी (16 मार्च) सकाळी सोशल मीडियावर तिची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी अशा प्रकारच्या वृत्तांकडे दखल घेत त्यांनाही केस डायरीत समाविष्ट केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-संगीतकाराने भावाच्या नावालाच बनवले आपले आडनाव, म्हणाला ‘माझं नाव साजिद वाजिद असं आहे आणि…’

-‘या’ कारणामुळे राजपाल यादवला खावी लागली होती ‘जेलची हवा!’ तुरूंगातही वाजवला आपल्या विनोदी अंदाजाचा डंका

-बनायचे होते अभिनेता, पण ‘मला संधीच मिळाली नाही’ म्हणत गायकाने केला अपूर्ण स्वप्नाचा खुलासा


Leave A Reply

Your email address will not be published.