Friday, November 22, 2024
Home कॅलेंडर आपल्या डान्सने सगळ्यांना भुरळ घातलेल्या अमृता खानविलकरचा असा आहे सिनेसृष्टीतील प्रवास, वाचा सविस्तर

आपल्या डान्सने सगळ्यांना भुरळ घातलेल्या अमृता खानविलकरचा असा आहे सिनेसृष्टीतील प्रवास, वाचा सविस्तर

मराठी मालिका, नाटक, चित्रपट, रियॅलिटी शो आणि हिंदी चित्रपटात काम करून नावारूपाला आलेली अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. अभिनयासोबतच तिच्या डान्स कौशल्याने तिने अवघ्या महाराष्ट्राला तिच्या प्रेमात पाडले आहे. तिच्या सौंदर्याने लाखो मुलांना भुरळ घातली आहे. सोशल मीडियावर देखील तिचे लाखोंमध्ये फॉलोवर्स आहेत. अशातच गुरूवारी (23 नोव्हेंबर) अमृता तिचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर जाणून घेऊया तिच्याबाबत काही खास गोष्टी…

अमृता खानविलकरचा जन्म 23 नोव्हेंबर 1984 मध्ये मुंबई येथे झाला. लहानपणापासूनच तिला डान्सची प्रचंड आवड होती. त्यामुळे शाळेत असताना अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात ती भाग घेत असायची. तिच्या वडिलांचे नाव राजू खानविलकर आणि आईचे नाव गौरी खानविलकर आहे. अमृताला एक लहान बहीण देखील आहे. जिचे नाव आदिती असे आहे. (Marathi actress amruta Khanvilkar celebrate her birthday let’s know about her)

अमृताने 2004 साली ‘इंडियाज बेस्ट सिनेस्टार की खोज’ या रियॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. त्यानंतर 2005साली तिने ‘अदा’ आणि ‘टाईम बॉम्ब 9/12’ या मालिकांमध्ये काम केले. तिच्या या पात्रांचे सर्वत्र कौतुक झाले. यानंतर2006 साली तिला चित्रपटातून ऑफर आली. तिने ‘गोलमाल’ या मराठी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. याच वर्षी तिने ‘मुंबई सालसा’ या हिंदी चित्रपटात काम केले. तिने 2007 साली ‘साडे माडे तीन’, ‘हॅट्रिक’, ‘कॉन्टॅक्ट’, ‘फुंक’, ‘दोघात तिसरा आता सगळं विसरा’, ‘गैर’, ‘नटरंग’, ‘झक्कास’, ‘धूसर’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘सतरंगी’, ‘शाळा’, ‘आयना का बायना’, ‘हिंमतवाला’, ‘बाजी’, ‘वेलकम जिंदगी’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘बस स्टॉप’, ‘वन वे तिकीट’, ‘मलंग’, ‘वेल डन बेबी’ यांसारख्या चित्रपटात काम केले.

यासोबत अमृताने अनेक रियॅलिटी शोमध्ये भाग घेतला आहे तसेच अनेक शोचे परीक्षण देखील केले आहे. तिने ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या शोला होस्ट केले आहे. तसेच ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ या शोला देखील होस्ट केले आहे. तिने ‘2 मॅड’ या शोचे परीक्षण केले आहे. यासोबतच ‘सुपर डान्सर महाराष्ट्राचा’ आणि ‘सुर नवा ध्यास नवा’ या शोचे देखील परीक्षण केले आहे. तिने ‘खतरों के खिलाडी’ या शोमध्ये देखील भाग घेतला होता.

अमृताने 2012 साली ‘नच बलिये 7’ मध्ये हिमांशू मल्होत्रासोबत भाग घेतला होता. या शोमध्ये त्यांची जोडी विजेती झाली होती. त्यानंतर 2015 साली त्या दोघांनी लग्न केले.

हेही वाचा-
साऊथ सुपरस्टार नागा चैतन्यचे आलिशान घर पाहिलंय का? पाहून तुम्हीही म्हणाल, क्या बात है!
घटस्फोटानंतर ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात पडलाय नागा चैतन्य, फोटोही होतायत व्हायरल

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा