Tuesday, May 28, 2024

घटस्फोटानंतर ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात पडलाय नागा चैतन्य, फोटोही होतायत व्हायरल

साल 2021 मध्ये अभिनेता नागा चैतन्यने (Naga Chaitanya) अभिनेत्री समंथापासून (Samantha Ruth Prabhu) घटस्फोट घेतला. त्यांच्या विभक्त झाल्याची बातमी ऐकून चाहतेही दु:खी झाले होते. समंथा आजकाल तिच्या परफेक्ट जोडीदाराच्या शोधात असेल, परंतु नागा चैतन्यचा प्रेमाचा शोध संपला आहे, असे म्हणावे लागेल. सध्या नागा चैतन्य अभिनेत्री शोभिता धुलीपालाला डेट करत असल्याची माहिती आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेता नुकताच शोभितासोबत त्याच्या नवीन घरात दिसला होता. तेव्हापासून दोघेही एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे.

नागाने हैदराबादच्या जुबली हिल्समध्ये नवीन घर घेतले आहे, ज्यात अजूनही काम सुरू आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघेही या घरात खूप कम्फर्टेबल दिसले. नागा चैतन्य शोभिताला त्याचे आलिशान घर दाखवत होता. यावेळी दोघेही खूप खुश दिसत होते. घर पाहिल्यानंतर नागा आणि शोभिता कारमधून एकत्र जाताना दिसले. (naga chaitanya is dating actress sobhita dhulipala)

दोघांना एकत्र पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये चर्चेचा पूर आला आहे. दोघांमध्ये प्रेम बहरत असल्याच्या चर्चा आहेत. तसेच, नागा अशा अभिनेत्यांपैकी एक आहे, ज्यांना त्यांचे वैयक्तिक आयुष्य कॅमेरासमोर आणणे फारसे आवडत नाही. आता नागा चैतन्य आणि शोभिता यांच्यात खरंच काही शिजतंय की, दोघे एकमेकांच्या सहवासात मैत्रीचा आनंद लुटत आहेत, हे वेळ आल्यावरच कळेल.

समंथा आणि नागा चैतन्य यांचा विवाह ६ ऑक्टोबर २०१७ रोजी गोव्यात झाला होता. लग्नाच्या चौथ्या वाढदिवसाच्या काही दिवस आधी अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून नागा चैतन्यपासून वेगळे झाल्याची माहिती दिली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, समंथा आणि नागा चैतन्य यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतल्यानंतर, दोघांनीही फॅमिली कोर्टात समुपदेशन केले होते. पण, समुपदेशन करूनही समंथा आणि चैतन्यने आपला निर्णय बदलला नाही.(naga chaitanya is dating actress sobhita dhulipala)

हेही वाचा-
समंथाच्या अगोदर ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत नात्यात होता नागा चैतन्य, तर ‘असा’ होता त्याचा सिनेसृष्टीतील प्रवास
साऊथ सुपरस्टार नागा चैतन्यचे आलिशान घर पाहिलंय का? पाहून तुम्हीही म्हणाल, क्या बात है!

हे देखील वाचा