सोशल मीडिया हे आजकाल असे एक प्लॅटफॉर्म आहे जिथे प्रत्येक व्यक्ती अगदी मन मोकळेपणाने व्यक्त होऊ शकतो. आपल्या मनातील सुख-दुःख तसेच आयुष्यातील काही प्रसंग शेअर करण्यासाठी तो एखाद्या व्यक्तीपेक्षा सोशल मीडियाला प्राधान्य देताना दिसत आहे. बॉलिवूड कलाकारांसाठी तर सोशल मीडिया हे त्यांचे दुसरे जग असते. त्यांची माहिती, फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असतात. अशीच सध्या तिच्या फोटोमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. तिने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यावर लागोपाठ चाहत्यांच्या कमेंट येताना दिसत आहे. (Marathi actress Amruta Khanvilkar’s photo viral on social media)
अमृता खानविलकरने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, ती सुंदर तितकीच बोल्ड दिसत आहे. या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा स्लिव्हलेस ड्रेस घातला आहे. तसेच काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या रेषांची ओढणी घेतली आहे. त्यामुळे तिच्या ड्रेसला खूप छान लूक आला आहे. तिने कानात मोठे इअर रिंग्ज घातले आहेत. तसेच कपाळी लाल रंगाची टिकली लावली आहे. तिने तिचे केस कर्ली केले आहे. या फोटोमध्ये ती तिच्या ओढणीच्या साहाय्याने पोझ देताना दिसत आहे. एकंदरित यात ती खूपच छान दिसत आहे.
तिच्या चाहत्यांना नेहमी प्रमाणे तिचे हे फोटो देखील आवडले आहेत. अनेक कलाकार तिच्या या फोटोवर कमेंट करत आहेत. एका युजरने तिच्या या फोटोवर कमेंट केली आहे की, “हे असे घातक फोटोशूट करताना फोटोग्राफरचे काळीज वाघाचे पाहिजे.” या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. खास गोष्ट म्हणजे अमृताने या युजरला रिप्लाय देखील दिला आहे. ती या युजरला उत्तर देत म्हणाली आहे की, “हे फोटो आईने काढले आहेत.” तिच्या या फोटोचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.
अमृताच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. तिने ‘नटरंग’, ‘चोरीचा मामला’, ‘वेलकम जिंदगी’, ‘बाजी’, ‘वेल डन बेबी’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने ‘जीवलगा’ या लोकप्रिय मालिकेत देखील काम केले आहे. या मालिकेत तिचासोबत स्वप्नील जोशी, सिद्धार्थ चांदेकर आणि मधुरा देशपांडे हे कलाकार होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-