Tuesday, June 18, 2024

‘या’ शुल्लक करणासाठी सोनू निगमवर आमदाराच्या पोराचा हल्ला, पोलीस तक्रार करताना केला खुलासा

बॉलिवूडमधील अतिशय प्रतिभावान गायक असणाऱ्या सोनू निगमसोबत नुकतीच एक धक्काबुक्कीची घटना घडली. सोनू मुंबईमधील चेंबूर या भागात लाइव्ह परफॉर्मन्स देत असताना त्याला एका इसमाकडून धक्काबुक्की करण्यात आली. प्राप्त होणाऱ्या माहितीनुसार धक्काबुक्कीचा आरोप शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटातील आमदाराच्या मुलावर ठेवण्यात आला आहे. त्याच्या विरोधात सोनू निगमने चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

एका माहितीनुसार लाइव्ह परफॉर्मन्स झाल्यानंतर जसा सोनू बाहेर निघत पायऱ्या उतरत असताना ही घटना घडली आहे. या घटनेत कोणतीही हातापाई झालेली नाही. त्याने सांगितले आहे की, या घटनेची तक्रार मात्र त्याने नोंदवली आहे. ही तक्रार नोंदवण्यामागचे कारण सांगताना तो म्हणाला की, “जेव्हा कोणी एखाद्या कलाकारांना सेल्फी किंवा फोटो साठी विचारता त्यानंतर नाही म्हटले की, राग व्यक्त करतात, धक्काबुक्की करतात हे चुकीचे आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सोनूकडे देखील कथित व्यक्तीने सेल्फीची मागणी केली होती. त्याला सेल्फीसाठी पकडले गेले नंतर समजले की, त्या व्यक्तीचे नाव स्वप्नील फेटरपेकर असून तो चेंबुरचे आमदार प्रकाश फेटरपेकर यांचा मुलगा आहे. मिळणाऱ्या माहितीनुसार सोनू निगमच्या जवळचे समजले जाणारे रब्बानी खान या धक्काबुक्कीत जखमी झाले आहे. यात त्याचा बॉडीगार्ड हरिप्रसाद मध्ये आला आणि त्याने परिस्थिती हाताळली. आरोपी स्वप्नीलने हरिप्रसादला देखील धक्का दिला. त्यानंतर त्याने सोनूला धक्का दिला. त्यामुळे सोनू खाली पडला. त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये नेले गेले, मात्र सुदैवाने त्याला कोणतीही जखम झालेली नाही.

या घटनेनंतर सोनू निगमने IPC चे कलम 341, 337, 323 अंतर्गत चेंबूर पोलिसांत तक्रार दाखल केली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यातअसल्याची माहिती पोलीस उपायुक्त हेमराजसिंह राजपूत यांनी दिली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॉलिवूडमधील अभिनेता आयुष्मान खुराना झाला ‘युनिसेफ इंडिया’चा ब्रँड एम्बेसिडर
स्वराने ट्वीटमध्ये ‘भाऊ’ म्हटल्यानंतर होणाऱ्या ट्रोलिंगला फहादने दिले चाेख उत्तर; म्हणाला, ‘हिंदू-मुस्लिम भाऊ…’

हे देखील वाचा