Friday, July 5, 2024

सुपर्ब! मराठमोळ्या अनुजा साठेचा वर्कआऊट पाहून तुम्हीही व्हाल थक्क; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

आपल्या आयुष्यात फिटनेसला अनन्यसाधारण महत्व आहे. प्रत्येकजण फिट दिसण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतात. यात कलाकार म्हटल्यावर तर त्यांना त्यांच्या दिसण्याकडे, बॉडीकडे प्रकर्षाने लक्ष द्यावे लागते. कलाकार त्यांच्या फिटनेसची आणि डाएटची खूप काळजी घेतात. त्यांचे जिममधील व्यायाम करताना फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. अशातच अभिनेत्री अनुजा साठे हिचा वर्कआउट करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अनुजाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून वर्कआउट करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो बघून तुम्ही नक्कीच प्रेरित व्हाल. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने पिवळ्या रंगाचा टॉप आणि पँट परिधान केली आहे. तसेच तिने डोक्यात टोपी घातली आहे. या व्हिडिओवर तिने ‘एब्स ऑन फायर’ असे लिहले आहे. या व्हिडिओमध्ये ती जीममध्ये वर्कआऊट करताना दिसत आहे. (marathi actress anuja sathe’s work out video viral on social media)

हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “प्रत्येक छोट्या विजयामध्ये अजूनही कोर घट्ट ठेवणे आणि शरीराला स्थिर ठेवणे शिकत आहे.” तिचा हा व्हिडिओ सर्वांनाच खूप आवडला आहे.

या व्हिडिओवर अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने फायर इमोजी पोस्ट केली आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. तिचे चाहते या व्हिडिओवर कमेंट करून तिच्या फिटनेसचे कौतुक करत आहेत. काही दिवसांपूर्वी तिचा आणि अभिज्ञा भावेचा एक मजेशीर व्हिडिओ च्यारलं झाला होता. त्यांच्या या व्हिडिओला देखील नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.

अनुजाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. तिने ‘एक थी बेगम’, ‘पेशवा बाजीराव’, ‘तमन्ना’, परमाणू’, ‘झाँसी की राणी’, ‘बाजीराव मस्तानी’ या हिंदी चित्रपटात आणि मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच तिने मराठीमध्ये ‘व्हाट्सऍप लग्न’, ‘राखणदार’, ‘मी पण सचिन’, ‘भो भो’, ‘घंटा’, ‘मांडला दोन घडीचा डाव’, ‘लगोरी’ या मराठी मालिका आणि चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘आता तिला पाहून काळजाचा ठोका चुकणार नाही, तर कायमचा थांबणार’, ‘रात्रीस खेळ चाले ३’ चा प्रोमो प्रदर्शित

-‘महाराष्ट्राचा बहुरंगी, बहुढंगी तमाशा’, सोनाली कुलकर्णीच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

-‘अब क्या कहे क्या नाम ले…’, म्हणत अंकिता लोखंडेने लावले जोरदार ठुमके; डान्स व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा