Thursday, July 31, 2025
Home मराठी ‘क्या खूब लगती हो, बडी सुंदर दिखती हो’, अन्विता फलटणकरच्या पारंपरिक लूकवर भाळले चाहते

‘क्या खूब लगती हो, बडी सुंदर दिखती हो’, अन्विता फलटणकरच्या पारंपरिक लूकवर भाळले चाहते

‘मम्मीची एक फाईट आणि वातावरण टाईट’ हा डायलॉग आठवतोय ना? आठवणारच !‌ २०१९ मधील गर्ल्स चित्रपटातील या डायलॉगने सर्वांना वेड लावले होते. यासोबत वेड लावले या चित्रपटातील मती, मॅगी आणि रुमीने. यातील बिनधास्त, बेधडक आणि वेळ आल्यावर डायरेक्ट हातापायीवर येणारी रुमी म्हणजे अन्विता फलटणकर. याच चित्रपटातून एक गुबगुबीत, क्यूट अभिनेत्री सर्वांसमोर आली. सध्या अन्विता जोरदार चर्चेत आहे. सोशल मीडियावर देखील तिचा चांगलाच वावर असतो. अशातच तिचा एक फोटो समोर आला आहे.

अन्विताने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, ती मराठमोळ्या पोशाखात दिसत असून, तिने जांभळ्या रंगाची साडी त्यावर चॉकलेटी रंगाचे ब्लाऊज, कपाळावर चंद्रकोर आणि नाकात नथ घातली आहे. तसेच गळ्यात मोत्याचे दागिने देखील घातले आहेत. तिच्या या रूपामध्ये तिचे सौंदर्य खुलून आले आहें. रूप खूप खुलले आहे.(Marathi actress Anvita faltankar share her traditional look photo on social)

तिने शेअर केलेल्या या फोटोवर तिच्या एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “क्या खूब लागती हो, क्या सुंदर दिखती हो,” तसेच बाकी अनेक चाहते या फोटोवर कमेंट करत आहेत. तिच्या चाहत्यांना तिचा साडीमधील पारंपरिक लूक खूप आवडला आहे.

अन्विता सध्या झी मीडियावरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत काम करत असून, मालिकेत तिच्यासोबत शाल्व किंजवडेकर हा मुख्य भूमिकेत आहे. त्या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडत आहे. ओम आणि स्वीटू हे दोघे झी मराठीवरील अत्यंत लोकप्रिय जोडपे आहे. प्रेक्षक त्यांना खूप प्रेम देतात. अन्विताने या आधी ‘गर्ल्स’ या चित्रपटात काम केले. तसेच तिने ‘टाईमपास’ या चित्रपटात केतकी माटेगावकरच्या मैत्रिणीची भूमिका निभावली होती. शाल्वने देखील अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपटात काम केले आहे. त्याने ‘हंटर’, ‘मेड इन हेवन’, ‘बकेट लिस्ट’, ‘एक सांगायचंय’ या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

राज कुंद्रावर प्रश्न ऐकताच मीडियावर चिडली शिल्पा, म्हणाली ‘मी राज कुंद्रा आहे का?’

‘रेपिस्ट’ची प्रतिमा तयार झालेल्या रंजीत यांना लग्नासाठी मुलगी मिळणे झाले होते अवघड, मग…

सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुरुवात केलेल्या यश चोप्रा यांनी, शाहरुखसह अनेक कलाकारांना बनवले सुपरस्टार

हे देखील वाचा