Saturday, July 27, 2024

निळू फुले यांची लेक अभिनेत्री गार्गी फुलेंची राजकारणात एन्ट्री, वडिलांच्या विचारधारेशी साधर्म्य असलेल्या ‘या’ पक्षात प्रवेश

मनोरंजनविश्वातील अनेक लहान मोठे कलाकार सध्या राजकारणात प्रवेश करत त्यांची राजकीय इनिंग सुरु करताना दिसत आहे. अनेक कलाकारांनी विविध राजकीय पक्षांमध्ये प्रवेश केला आहे. आता मराठी मनोरंजनविश्वातील अजून एक लोकप्रिय अभिनेत्री असलेल्या गार्गी फुलेने राजकीय पक्षात प्रवेश केले आहे. नुकतेच गार्गी यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत त्यांचे नवीन राजकीय करियर सुरु केले आहे.

गार्गी यांच्या पक्ष प्रवेशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील उपस्थित होते. या प्रवेशानंतर गार्गी फुले यांनी सांगितले की, “मागील अनेक दिवसांपासून माझी अजित पवार यांच्यासोबत काम करण्याची इच्छा होती. जेव्हा मला या प्रवेशाबद्दल विचारणा झाली तेव्हा लगेच हो उत्तर. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारसरणी आणि त्यांचे विचार आहेत तेच विचार माझ्या वडिलांचे निळू फुले यांचे होते. त्यामुळे माझ्या वडिलांचे जे विचार होते. त्या विचारांना राष्ट्रवादी कॉंग्रेस योग्य न्याय देईल असे मला वाटते.”

पुढे गार्गी फुले म्हणाल्या, “राष्ट्रवादीसोबत काम करण्याचा मला आनंद आहे. शरद पवार, अजित पवार यांच्यासोबत माझ्या वडिलांचे चांगले संबंध होते. मी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये येऊन प्रवाहात येईल. आता फक्त किनाऱ्यावर बसून पाहायचे नाही आहे. मुख्य प्रवाहात येऊन काम करायचे मी ठरवले आहे. तरुणांना वाटते राजकारणात यावे आणि बदल व्हावा त्यानुसार माझा सुद्धा प्रयत्न असेल.”

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून देखील याची माहिती देणारी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष मा. जयंतराव पाटील, खासदार सुनील तटकरे, सांस्कृतिक सेल प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ सिने अभिनेते स्वर्गीय निळूभाऊ फुले यांची कन्या अभिनेत्री गार्गी फुले, नृत्य दिग्दर्शक अशुतोष राठोड, निर्माते नितीन पवार यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश झाला. त्याचबरोबर आदरणीय पवार साहेबांनीदेखील सर्वांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सांस्कृतिक सेल प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी गार्गी फुले यांना राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक सेलच्या प्रदेश उपाध्यक्ष, आशुतोष राठोड यांची पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व नितीन पवार यांची पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी नियुक्ती केली.”

तत्पूर्वी गार्गी फुले यांनी स्त्रीमुक्ती या विषयात पदवीचे शिक्षण घेतले असून, अभिनयाचे बाळकडू त्यांना वडिलांनीच दिले. सत्यदेव दुबे यांच्याकडून गार्गी यांनी अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आहे. मराठी नाटक, मालिका, चित्रपट तसेच वेबसीरिजमध्येही त्यांनी काम केलं आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
‘प्रत्येक दिवस मधुचंद्रासारखा आहे’, वैवाहिक जीवनाबद्दल काय बोलली दलजीत कौर? एकदा वाचाच

सुंबुलवर काेसळला दु:खाचा डाेंगर; अभिनेत्री हंबरडा फाेडत म्हणाली, ‘तू नेहमी माझ्या हृदयात राहशील’

हे देखील वाचा