Friday, July 5, 2024

‘मी आयुष्यात खुप काही भोगलंय’, हेमांगीने ट्रोलिंगवर लिहिली भली मोठी पोस्ट; वाचल्यावर तुम्हीही स्तब्ध व्हाल

मराठी चित्रपट जगतातील सर्वात बिनधास्त अभिनेत्री म्हणून हेमांगी कवीचे (Hemangi kavi) नाव घेतले जाते. आपल्या दमदार अभिनयासाठी तर ती प्रसिद्ध आहेच त्यासोबतच ती सोशल मीडियावरील पोस्टमुळेही चर्चेत असते. मुद्दा आणि प्रश्न काहीही असो आपले निर्भीड मत मांडायला ती कधीही मागेपुढे पाहत नाही. अशा पोस्टमुळे कधी तिचे कौतुक होते तर कधी कधी हेमांगीला टीकेचा सामनाही करावा लागतो. सध्या हेमांगीची अशीच एक फेसबूक पोस्ट व्हायरल होत आहे.ज्यामध्ये आयुष्यात मी खूप काही भोगलंय म्हणत टीकाकरणाऱ्यांना उत्तर दिले आहे. हेमांगी  मराठी चित्रपट जगतातील यशस्वी आणि गाजलेली अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने ती नेहमीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असते. त्याचप्रमाणे हेमांगी सोशल मीडियावरही चांगलीच चर्चेत असते. तिच्या अनेक पोस्टवर नेटकरी तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतात.यावरच तिने एक पोस्ट करत ट्रोल करणाऱ्यांचे चांगलेच कान टोचले आहेत. सध्या तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे ज्यामध्ये हेमांगीने तिच्या आयुष्यातील अनेक संकटांचा उल्लेख केला आहे.

या पोस्टमध्ये हेमांगी म्हणते की, “माझ्या लक्षात आलंय की मी लहानपणापासून खूप कमी वेळा रडलेय. क्वचितच स्वतःवर तर कधीच नाही. खरंच नाही. हे बरोबर की चूक हे ही मला कळत नाही. म्हणूनच की काय माझा बाकीचा रडण्याचा कोटा मला माझ्या कामातून भरून काढावा लागतो. नाटकात, मालिका- चित्रपटांमध्ये मी इतकी रडलीये ना काय सांगू. इतकी की माझ्या माणदेशातल्या दुष्काळी भागांचा पाण्याचा प्रश्न सुटेल . काही लोकांना माझं स्टेज, स्क्रिनवरंच  रडणं इतकं खरं वाटतं की ते रडायला लागतात, त्यांचा गैरसमज होतो की मी आयुष्यात खूप काही भोगलंय म्हणूनच माझ्या कामात ते दिसतं वगैरे! त्यांचा हा गैरसमज मला सुखावतो कारण म्हणजे मी बरं काम करते हा माझा समज होतो. मला एक सवय आहे ती चांगली का वाईट हेही माहीत नाही. पण आहे.”

https://www.facebook.com/100000289144138/posts/5573839839302266/

“मला शरीरावर कुठे किरकोळ लागलं, खरचटलं, भाजलं, चिमटलं तर तात्पुरतं एक रिफ्लेक्स एक्शन म्हणून मी रिएक्ट होते जसं की ‘आ’ म्हणून ओरडते, डोळे घट्ट मिटून ल्स-ल्स करते, कधी डोळ्यात पाणी येतं, कधी स्वतःच भरल्या डोळ्यांनी फुंकर मारते, नवरा बाजूला असलाच तर हात घट्ट पकडतो वगैरे वगैरे. पण हे सगळं अगदी काही सेकंदासाठी. त्यांनतर त्या जखमेवर औषध, मलमपट्टी वगैरे करत नाही. मी आयुष्यात कधीच टीटीचं इंजेक्शन  घेतलं नाहीए. थोडक्यात दादापुता करत बसत नाही. यासाठी नवरा बऱ्याच वेळा रागावतो. काही वेळाने मला जखम झालीये हे मी टक्क विसरून जाते, सोडून देते, जखम तिचा वेळ घेऊन तिची तिची बरी होत जाते. मला कळत नाही.”

या पोस्टमध्ये तिला ट्रोल करणाऱ्यांना उद्देशून हेमांगी म्हणते की, “तर सांगायचा मुद्दा काय तर इतक्या वर्षात मी एक ऑबजर्व केलंय जी लोकं आपल्या शरीरावरच्या साध्या जखमेवर ही  ओव्हर रिएक्ट होतात, ऑपरेशन झाल्यासारखं उपाय करत बसतात ना ती लोकं मनाच्या जखमेलाही खूप काळ कुरवळत बसतात, उपाय शोधत आणि करत बसतात, अधिकाधिक दुःखी होतात आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना पण कामाला लावतात. किरकोळ जखम झाल्यावर ती सोडून द्यावी, ती बरोबर भरून निघते. आपलं शरीर एक जादू आहे आणि त्यात एक solid doctor लपून आपला उपाय करत असतो हे कुणी नव्याने सांगायला नको. मन सुद्धा शरीरातलाच एक भाग! हृदयाला connected असलेला मेंदू जवळचा! त्या भागाला जखम झाली तर त्याला किती महत्व द्यावं हे एकदा ठरवलं ना की सगळं ठीक होतं! सोडून देणे हा सर्वात उत्तम रामबाण उपाय! Social media वर झालेलं trolling, कुणी मला काही बोललं आणि जर ते माझ्या मनाला लागलं तर मी हे असंच सोडून देते!”

थोडक्यात या पोस्टमधून हेमांगीने आजूबाजुच्या परिस्थितीने आयुष्यातील अनेक अडचणींनी खूप काही शिकंवल आहे, प्रत्येक संकटाला तोंड द्यायला शिकवलं  आहे असे म्हणत अशा ट्रोल करण्याने किंवा टीका करण्याने मी अजिबात खचून जाणार आहे असाच संदेश दिला आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी सुंदर प्रतिक्रिया देत हेमांगीचे कौतुक केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा