×

बहुप्रतिक्षित भूलभुलैय्या २ सिनेमाचा टिजर अखेर प्रदर्शित, अक्षय कुमारच्या भूमिकेत छाप पाडतोय ‘हा’ अभिनेता

अभिनेता अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) जबरदस्त विनोदी आणि रहस्यमय चित्रपटांमध्ये ‘भूलभुलैय्या’ चित्रपटाचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. २००७ मध्ये आलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना पोटधरुन हसायला लावले होते. या चित्रपटात कॉमेडीसोबतच हॉरर सीनचाही जोरदार मसाला पाहायला मिळाला होता. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाच्या रिमेकची चर्चा रंगली होती. आता प्रेक्षकांची ही प्रतिक्षा संपुष्टात आली असून ‘भूलभुलैय्या २’ चित्रपटाचा टीजर नुकताच समोर आला आहे, ज्यामध्ये अभिनेता अक्षय कुमारच्या भूमिकेत कार्तिक आर्यन( Kartik Aryan) छाप पाडताना दिसत आहे. आता प्रेक्षकांना या दमदार चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, बराच काळ प्रेक्षकांना भूलभुलैय्या २ चित्रपटाच्या टीजरची प्रेक्षकांना आतुरता लागली होती. जो नुकताच समोर आला आहे. भूलभुलैय्या मधील मेरे डोलना या गाण्याने आणि अंगावर काटे आणणाऱ्या भयावह बंगल्याच्या दृश्याने या टीजरची दमदार सुरूवात पाहायला मिळत आहे. फक्त ५३ सेकंदाच्या या टीजरने चित्रपटात भरपुर कॉमेडी, हॉरर आणि ड्रामा पाहायला मिळणार असल्याचेच थेट संकेत दिले आहेत. पहिल्या भूलभुलैय्या मध्ये ज्या प्रकारे  प्रेक्षकांना पडद्याशी खिळवून ठेवले होते त्याचप्रमाणे हा चित्रपटही प्रेक्षकांचे मनोरंजन करणार असल्याचे दिसत आहे.

या टीजरमध्ये अभिनेता कार्तिक आर्यनने अक्षय कुमारची दमदार भूमिका साकारली आहे. चित्रपटात कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी, राजपाल यादव, परेश रावल, तब्बू अशा दिग्गज कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन अनिस बाजमी यांनी केले आहे. हा बहुचर्चित चित्रपट २०मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

तत्पूर्वी , प्रियदर्शन यांनी दिग्दर्शित केलेला भूलभुलैय्या चित्रपट २००९ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. अक्षय कुमार, अमिषा पटेल, विद्या बालन, परेश रावल मनोज जोशी अशा दिग्गज अभिनेत्यांनी या चित्रपटात भूमिका साकारली होती. चित्रपटात तुफान कॉमेडीसह, रहस्यमय कथा दाखवण्यात आली होती. या चित्रपटातील विद्या बालनच्या डान्सने सर्वांनाच धक्का केले होते. चित्रपटाची कथा आणि गाणी सगळ्यांनीच प्रेक्षकांना वेडक लावले होते. त्यामूळे आता पुन्हा एकदा पडद्यावर प्रेक्षकांना या चित्रपटाचा थरार अनुभवता येणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Latest Post