Monday, July 15, 2024

‘लागली का गोळी’, म्हणत हेमांगी कवीने केला तिचा नवीन व्हिडिओ शेअर

आपल्या बिनधास्त वागण्यामुळे अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) नेहमीच चर्चेत राहते. सोशल मीडियावर तिच्या वाढत्या वावरामुळे तिच्या फॉलोवर्सची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ती तिचे अनके फोटो आणि व्हिडिओ शेअर करून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. मागील काही दिवसांपूर्वी ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत होती. अशातच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये आपण पाहू पाहू शकतो की, हेमांगीने साडी नेसली आहे. यावे तिने काही दागिने, नाकात नथ आणि कपाळी टिकली लावली आहे. व्हिडिओमध्ये ती डोळ्यांचे हावभाव करताना दिसत आहे. या लूकमध्ये ती खूपच आकर्षक दिसत आहे.

हा व्हिडिओ शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, ” पोचला का बाण तसं लागली का गोळी! अखियों से गोली मारे!” तिच्या या पोस्टवर अनेकांच्या कमेंट येत आहेत. तिचा हा व्हिडिओ आणि कॅप्शन अनेकांना आवडले आहे. तिच्या एका चाहत्याने या व्हिडिओवर कमेंट केली आहे की, “लडकी कमाल ……. अखियों से गोली मारे”
आणखी एकाने कमेंट केली आहे की, “मरता मरता वाचलो बाण आरपार् गेला.”

हेमांगीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिने, ‘बंदिशाळा’, ‘पिपाणी’, ‘धुडगूस’, ‘डावपेच’, ‘मनातल्या मनात’, ‘पारध’, ‘भूतकाळ’, ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’, ‘सविता दामोदर परांजपे’, ‘गोळाबेरीज’, ‘कोण आहे रे तिकडे’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. यासोबत तिने ‘तेरी लाडली मै’ आणि ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकांमध्ये काम करून तिचे नाव कमावले आहे. सध्या ती चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. मागील काही दिवसांपूर्वी ती ‘बाई ब्रा आणि बुब्स’ या प्रकरणामुळे खूप चर्चेत आली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा