Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

मराठमोळ्या जुई गडकरीच्या सुंदरतेने चाहते पुन्हा झाले घायाळ; व्हिडिओवरून नजर हटविणेही झालं कठीण

‘पुढचं पाऊल’ मालिकेत काम करून अभिनेत्री जुई गडकरी हिने चाहत्यांच्या मनात घर केले होते. अगदी उत्तमरित्या आपली भूमिका तिने पडद्यावर मांडली. सोज्वळ व्यक्तीमत्व कसे असावे, हे तिने तिच्या अभिनयाने सादर केले. अभिनयासोबतच तिच्या सौंदर्याचे देखील लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावर आपले सुंदर सुंदर फोटो आणि व्हिडिओ शेअर करून, ती चाहत्यांचे मन जिंकत असते. आता जुईने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो पाहून चाहते नव्याने तिच्या प्रेमात पडत आहेत.

जुई सोशल मीडिया साईट इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असते. यावर पोस्ट शेअर करून ती चर्चेत हीयेते. नुकत्याच शेअर केलेल्या तिच्या व्हिडिओमुळे ती पुन्हा चर्चेचा विषय बनली आहे. या व्हिडिओमध्ये जुई कमालीची सुंदर दिसत आहे. यात ती पारंपारिक अवतारात दिसली आहे. पिवळ्या साडीसह तिने काळ्या रंगाचं ब्लाउज परिधान केलं आहे. सोबतच नथ आणि इतर दागिने तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहेत. एकंदरित व्हिडिओमध्ये जुईची सुंदरता अगदी वेड लावणारी आहे.

चाहते व्हिडिओवर कंमेट्स करून तिच्या रूपाचे कौतुक करत आहेत. शिवाय यावर भरभरून लाईक्स देऊन प्रेमही व्यक्त केले जात आहेत. व्हिडिओ अगदी कमी वेळात वेगाने व्हायरल होताना दिसत आहे. मात्र जुईने असे व्हिडिओ शेअर करण्याची पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही तिने शेअर केलेला व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता.

जुईच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने ‘श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी’ या मालिकेद्वारे टीव्हीवर पदार्पण केले होते. नंतर ती ‘माझी या प्रियाला प्रीत कळेना’मध्ये झळकली होती. मात्र तिला प्रसिद्धी ‘पुढचं पाऊल’मध्ये कल्याणीची भूमिका साकारून मिळाली. तिचे हे पात्र तेव्हा चांगलेच गाजले होते. याशिवाय जुई ‘मराठी बिग बॉस’ मध्येही झळकली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा