‘इंडियन आयडल १२’ मधून नगरच्या अंजली गायकवाडला बाहेर काढल्याने भडकले युजर्स; म्हणाले, ‘तिला परत…’

Anjali gaikwad eliminate from Indian ideol 12, fans get angry on makers


टेलिव्हिजनवरील ‘इंडियन आयडल 12’ हा शो नेहमीच खूप चर्चेत असतो. या शोमध्ये दर आठवड्यात काही ना काही नवीन घडत असते. त्यामुळे हा शो सोशल मीडियावर खूप चर्चेत असतो. नुकतेच मागच्या आठवड्यात या शोमधील गायिका अंजली गायकवाड हिला स्पर्धेच्या बाहेर काढले गेले आहे. अंजलीचे गाणे सर्वांना खूप आवडत होते. तिला प्रेक्षकांचा चांगला पाठिंबा होता. शिवाय सगळ्या परीक्षकांना तिचे गाणे आवडायचे. बाहेरून आलेले पाहुणे देखील तिच्या गायनाचे खूप कौतुक करत असायचे. परंतु आता अंजली या शोमधून बाहेर गेल्याने तिचे चाहते खूपच नाराज झालेले दिसत आहेत. या शोच्या निर्मात्यांनी देखील तिला या शोमध्ये परत घ्या, अशी विनंती केली आहे.

अंजलीला जेव्हा या शोमधून बाहेर काढले, तेव्हा ही गोष्ट तिच्या चाहत्यांना अजिबात आवडली नव्हती. त्यांनी हा सगळा राग या शोमधील शनमुखप्रिया आणि दानिश यांच्यावर काढला. मागच्या आठवड्यात शनमुखप्रियाने आशा भोसले यांचे, ‘चुरा लिया है तुमने जो दिल को’ हे गाणे गायले होते. परंतु तिने ज्या अंदाजात हे गाणे गायले ते प्रेक्षकांना अजिबात आवडले नाही. त्यांनी असे सांगितले की, तिला या शोमधून बाहेर काढा. ती आणि दानिश चांगल्या गाण्यांची वाट लावतात, असा त्यांचा आरोप होता.

एका युजरने लिहिले होते की, “त्या शनमुखप्रियाला आधी शोमधून बाहेर काढा. ती गायला लागल्यावर आम्ही टीव्हीचा आवाज म्युट करतो. ती चांगल्या गाण्यांची वाट लावते. तुम्हाला खरंच अस वाटतं का की अंजलीपेक्षा शनमुखप्रिया चांगले गाते. तिला परत बोलवा.”

टेलिव्हिजनविश्वात होत असणाऱ्या या सगळ्या गोष्टींवर नजर ठेऊन असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजय माकन यांनी देखील त्यांचे मत व्यक्त केले आहे. त्यांनी एक ट्वीट केले आहे की, “हा काळ अतिशय कठीण आहे. मोबाईलवरील तसेच सोशल मीडियावरील प्रत्येक पोस्ट घाबरवणारी आहे. काय सुरू आहे काहीच कळत नाहीये. आम्ही अगदी तासभर संगीत विश्वाची सफर करतो. कार्यक्रमातील कोणताही स्पर्धक इलिमिनेत होऊ शकत नाही.” त्यांनी #Anjali gaikwad ला परत आणा, असे आवाहनही केले.

या सगळ्या घडलेल्या प्रकारनंतर आता अंजलीला या शोमध्ये परत घेणार आहेत की, नाही हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. सगळेजण अंजली परत या शोमध्ये येण्याची आस लावून बसले आहेत.

अहमदनगरच्या अंजलीने पटकावलंय ‘सा रे गा मा पा लिटिल चॅम्प’चे विजेतेपद
खरं तर अंजली गायकवाड ही अहमदनगर जिल्ह्यामधील रहिवासी आहे. अंजलीने आपल्या वडिलांकडून शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले आहेत. विशेष म्हणजे तिने ‘सा रे गा मा पा लिटिल चॅम्प’ या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. याव्यतिरिक्त ती ‘इंडियन आयडल १२’ मधील सर्वात कमी वयाची स्पर्धक होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.