Sunday, April 14, 2024

‘तुका म्हणे पवारा, नको उडवू तोंडाचा फवारा…’, केतकी चितळेची शरद पवारांबद्दल वादग्रस्त पोस्ट

स्वतःच्या वादग्रस्त विधानांमुळे अनेकदा चर्चेत आलेली प्रसिद्ध अभिनेत्री केतकी चितळे हिने आता आणखीन एक वादग्रस्त पोस्ट केली आहे. यावेळी केतकीच्या पोस्टमध्ये थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शरद पवार यांच्यावर या पोस्टमध्ये आक्षेपार्ह कवन करण्यात आले आहे.

काय आहे पोस्ट?

केतकी चितळेने तिच्या फेसबुक अकाऊंटवर अभंगाच्या भाषेत रचना केलेले एक काव्य पोस्ट केले आहे. ज्यात भाषा आणि शब्द रचना याचा अर्थ लावल्यास थेट शरद पवार यांनाच टार्गेट केल्याचे दिसत आहे.

केतकी चितळेची पोस्ट जशीच्या तशी, वाचा…

केतकी चितळेच्या या पोस्टमध्ये सदर काव्य हे ॲड.नितिन भावे नामक व्यक्तीचे असल्याचे दिसत आहे. मात्र, केतकीने स्वतःच्या अकाउंटवर ही पोस्ट केल्याने तिच्यावर सध्या टीका केली जात आहे.

“तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll
ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक
सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll
समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll
ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll
भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll
खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll
याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll
-Advocate Nitin Bhave”

अशी ही संपूर्ण पोस्ट आहे. अभिनेत्री केतकी चितळेच्या या पोस्टमुळे तिच्या सर्वबाजूने टीका होत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा