‘टाईमपास’ चित्रपटात ‘प्राजक्ता’ची भूमिका साकारून केतकी माटेगावकरने अवघ्या प्रेक्षकवर्गाला वेड लावले होते. लोभसवाणा चेहरा आणि गोंडस स्मितहास्याद्वारे ‘प्राजू’ने लाखो चाहत्यांची मने जिंकली. अभिनयाव्यतिरिक्त ती आपल्या आवाजामुळेही चाहत्यांच्या मनावर राज्य करते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय राहते आणि आपले नवनवीन लूकमधील फोटो शेअर करत चाहत्यांचेे लक्ष वेधत असते. अलीकडेच तिने पोस्ट केलेला एक फोटो आता चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.
हा फोटो केतकीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. फोटोत तिच्या चेहऱ्यावरची निरागसता सहज दिसून येत आहे. तिने फोटो शेअर करत अतिशय प्रेरणादायी असे कॅप्शनही दिले आहे. तिने लिहिले की, “आयुष्याकडे उत्साहाने पाहा आणि तुमचे आयुष्यही तुम्हाला उत्साहित करत राहील. जीवनाच्या प्रत्येक क्षणात अनंत प्रेम भरलेले आहे.”
अभिनेत्रीच्या चाहत्यांना तिचा हा फोटो बराच पसंत पडलाय. नेटकरी फोटोवर कमेंट्स करून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. एका चाहत्याने केतकीचे कौतुक करत लिहिले, “आरारारा खतरनाक! उसाला तोड आहे, पण तुझ्या फोटोला नाही!” फोटोसोबतच ही कमेंटही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
केतकीने २०१२ साली ‘शाळा’ या चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले होते. त्यानंतर तिने बऱ्याच मराठी चित्रपटात भूमिका साकारून आपले नाव कमावले आहे. तिच्या चित्रपटांच्या यादीत ‘आरोही’, ‘काकस्पर्श’, ‘तानी’, ‘टाईमपास’, ‘टाईमपास २’, ‘फुंतरू’ यांचा समावेश आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-बोल्डनेसचा तडका! अमेरिकन मॉडेल किम कर्दाशियानचे बोल्ड फोटो व्हायरल, वाढला सोशल मीडियाचा पारा