Monday, June 9, 2025
Home मराठी ‘सोनपरी’ माधवी निमकरच्या स्टायलिश फोटोवर भाळले तिच्या चाहत्यांचे मनं, किलर लूकने केले सर्वाना घायाळ

‘सोनपरी’ माधवी निमकरच्या स्टायलिश फोटोवर भाळले तिच्या चाहत्यांचे मनं, किलर लूकने केले सर्वाना घायाळ

आपल्या आयुष्यात फिटनेसला खूप महत्व आहे. त्यात कलाकार म्हटले तर ते २४ तास त्यांच्या फिटनेसची काळजी घेत असतात. अशीच मराठी टेलिव्हिजनवरील एक नावाजलेली खलनायिका देखील तिच्या फिटनेसची खूप चांगल्याप्रकारे काळजी घेताना दिसत असते. ती अभिनेत्री म्हणजे माधवी निमकर. माधवी अनेकवेळा तिचे जिम आणि योगा करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

अशातच तिचे काही किलर फोटो समोर आले आहेत.माधवीने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने गुलाबी रंगाची प्लेन अशी सुंदर साडी नेसली असून, त्यावर स्टायलिश काळ्या रंगाचे ब्लाऊज घातले आहे. तर गळ्यात एक सुंदर मोत्याचा नेकलेस आणि हातात काळ्या रंगाची पर्स घेतली आहे. या लूकमध्ये ती फार ग्लॅमरस दिसत आहे. (Marathi actress madhavi nimkar share her photos on social media)

तिने शेअर केलेल्या या फोटोवर तिचे चाहते सातत्याने कमेंट करून तिच्या या लूकचे कौतुक करत आहेत. तिच्या एका चाहत्याने या फोटोवर “सोनपरी” अशी कमेंट केली आहे. तसेच इतर आणखी चाहते हार्ट ईमोजी पोस्ट करत आहेत.

माधवीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने २००९ साली ‘बायकोच्या नकळतचं’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. यानंतर तिने ‘असा मी तसा मी’ या चित्रपटात काम केले. तिने ‘धावाधाव’, ‘सगळं करून भागले’, ‘संघर्ष’ या चित्रपटात काम केले आहे. पुढे तिने तिच्या अभिनयाचा मोर्चा मराठी टेलिव्हिजनकडे वळवला. तिने ‘स्वप्नांच्या पलीकडले’, ‘हम तो तेरे आशिक है’, ‘द रायरीकर केस’ या मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या ती स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत नकारात्मक भूमिकेत काम करत आहे. तरी देखील मालिकेतील तिचे पात्र आणि डायलॉग तिच्या चाहत्यांना खास भुरळ घालत आहेत.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जन्मापासून आतापर्यंतचे निवडक फोटो शेअर करत स्वप्नील जोशीने लेकीला दिल्या जागतिक कन्यादिनाच्या शुभेच्छा

‘अपने पास बहुत पैसा है,’ म्हणत नेहाने अनोख्या अंदाजात दिल्या परीला कन्यादिनाच्या शुभेच्छा

-अखेर प्रतीक्षा संपली, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार रणवीर सिंग अन् दीपिका पदुकोणचा ‘८३’ चित्रपट

हे देखील वाचा