Tuesday, June 18, 2024

अरे संसार संसार! मानसी नाईक सासरी करतीये चुलीवर चपात्या, व्हिडिओ झाला व्हायरल

अभिनेत्री मानसी नाईक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती तिचे अनेक व्हिडिओ तसेच फोटो शेअर करत असते. ती तिच्या पतीसोबत देखील अनेकवेळा फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. लग्न झाल्यापासून ती चित्रपटापासून जरा दूर आहे, परंतु तरी देखील ती तिच्या चाहत्यांपासून दूर झाली नाही. ती नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अशातच तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

मानसी नाईकने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मानसी चक्क चुलीवर चपाती करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, मानसीने गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे. ती चुलीशेजारी बसून चपाती लाटत आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला ‘रुखी सुखी रोटी तेरे हात की’ हे गाणे लागले आहे. (Marathi actress Manasi naik share her roti making video on social media)

हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “भूक का रिश्ता सिर्फ रोटी से है, चमकती थालिया भूक नही मिटाती.” यासोबतच तिने लिहिले आहे की, “मी माझ्या सासरी जेव्हा चुलीवर चपात्या बनवायला शिकत होते.” तिचे चाहते हा व्हिडिओ पाहून खूपच प्रभावित झाले आहेत. अनेकांना तिचा हा व्हिडिओ खूपच आवडला आहे. अनेकजण या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्याने लिहिले आहे की, “मॅडम जेवण तयार झाले असेल तर येऊ का जेवायला.” तर आणखी एकाने लिहिले आहे की, “आज तर स्पेशल जेवण.” यासोबत तिचे अनेक चाहते या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.

मानसी नाईकच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, तिने २००७ साली ‘जबरदस्त’ या मराठी चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. ईटीव्ही मराठी या दूरचित्रवाहिनीवरून प्रसारित होणार्‍या ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेतील मुख्य नायिकेची तिने साकारलेली भूमिका विशेष गाजली. तसेच, ‘वाट बघतोय रिक्षावाला’ आणि ‘बाई वाड्यावर या’ या गाण्यांनी तिला विशेष ओळख मिळवून दिली. मानसी अभिनयापेक्षा तिच्या नृत्य कौशल्यामुळे ओळखली जाते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अर्रर्रर्र! कॅटरिना कैफ आणि विकी कौशल करणार नाही लग्न? नातेवाईकाने केला मोठा खुलासा

-अश्लील चित्रपट प्रकरणात पुन्हा वाढल्या राज कुंद्राच्या अडचणी, न्यायालयाकडून फेटाळण्यात आला अटकपूर्व जामीन

-Bigg Boss 15; जय भानुशाली झाला शोमधून आऊट, तर नेहा भसीन आणि विशाल कोटियानही झाले बेघर

हे देखील वाचा